Samudrik Shastra Your Ear Revels Your Personality: ज्योतिषशास्त्रात व्यक्तीच्या कुंडलीमध्ये स्थित ग्रहांचे विश्लेषण करून त्याच्या भविष्य आणि स्वभावाचे वर्णन केले जाते. ऋषी समुद्र यांनी लिहिलेल्या सामुद्रिक शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर असलेल्या खुणा, अवयवांचा आकार आणि रचनेच्याच्या आधारावर त्याचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव सांगितला जाऊ शकतो. आज आपण सामुद्रिक शास्त्रानुसार तुमच्या कानाचा आकार तुमच्या व्यक्तिमत्वाविषयी काय सांगतो हे पाहणार आहोत.
तुमच्या कानाचा आकार तुमच्या स्वभावाविषयी काय सांगतो?
१. मोठे कान
सामुद्रिक शास्त्रानुसार, जर कानाच्या पाळ्या व आकार मोठा असेल तर अशी व्यक्ती सहसा शांत स्वभावाची म्हणून ओळखली जाते. अत्यंत विश्वासू आणि संयमी असा या लोकांचा स्वभाव असतो. अशी माणसं सहजासहजी हार मानत नाही किंवा निराश होत नाही. जर तुमच्याही कानाचा आकार किंचित मोठा असेल तर तुम्ही स्वावलंबी आहात आणि स्वतःहून कठीण परिस्थिती हाताळण्यास सक्षम आहात. तुमची प्रवाही वृत्ती आहे. अनेकदा या मंडळींकडे जगात कोणाचं काय सुरु आहे याची सविस्तर माहिती असते पण त्यांच्या संयमी स्वभावामुळे त्यांना गॉसिप मध्ये स्वारस्य नसते.
२. लहान कान
लहान कान असलेल्या व्यक्ती सहसा लाजाळूपणा आणि इन्ट्रोव्हर्ट असतात. या व्यक्ती एकटे, कुटुंबासह किंवा जवळच्या मित्रांबरोबर वेळ घालवण्याचा आनंद घेतात पण ठराविक संख्येपेक्षा अधिक लोक आजूबाजूला असतील तर त्यांना आवडत नाही. असं असलं तरी त्यांना गरजेनुसार स्वभाव बदलता येतो. अशा व्यक्ती सर्जनशील, निरीक्षणशील असतात. त्यांना इतरांकडून स्वतःचं कौतुक करून घ्यायची गरज लागत नाही. यांना इतरांचं ऐकण्याची सवय कमी असते.
३. जोडलेला कान
सोप्या शब्दात अर्थ सांगायचा तर जिथे कान टोचले जातात अशा कानाच्या पाळीचा आकार अत्यंत लहान असतो, किंवा कानाची पाळी नसतेच व कान चेहऱ्याला जोडून असतो. अशा व्यक्तींचा स्वभावही खास असतो. यांची भावनिकदृष्ट्या शक्ती अफाट असते. सहानुभूतीपूर्ण आणि समजूतदार व्यक्तिमत्त्व, तर्कावर आधारित निर्णय घेण्याची क्षमता यामुळे त्यांना अडचणीतून बाहेर पडता येते. पण अनेकदा अडचणीत सापडण्याचे प्रमाणही इतरांच्या तुलनेत यांचेच अधिक असते.
हे ही वाचा<< ३ सप्टेंबरपर्यंत ‘या’ ७ राशींच्या नशिबात राहणार लक्ष्मीकृपा; रक्षाबंधनाला अनुभवाल नारळीभाताचा गोडवा
४. टोकदार कान
टोकदार कान असलेल्या व्यक्ती अंतर्ज्ञानी आणि कल्पनाशील असतात. तुमच्याकडे जगाकडे पाहण्याचा एक अनोखा मार्ग आहे आणि तुमच्याकडे चांगली भावनिक बुद्धिमत्ता आहे. तुम्ही बौद्धिक, महत्त्वाकांक्षी आणि तुमच्या भावना व्यक्त करण्यास न घाबरणाऱ्यांपैकी एक आहात असे आपले कान सांगतात.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)