हिंदू धर्मात साप या प्राण्याला फार महत्त्व आहे. नागपंचमीला त्याची मनोभावे पूजा केली जाते. तसेच साप शेतकऱ्यांचा मित्रही मानला जातो. कारण उंदरापासून तो शेतीचं संरक्षण करतो. असं असलं तरी एकदा आपण सापाला समोर पाहिलं की आपली बोबडी वळते. ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी जाणं टाळतो. हाच साप घरात घुसला तर मग अंगाचा थरकाप उडतो. याबाबतची माहिती सर्पमित्राला देऊन त्याला पकडून नेण्यास सांगतो. धार्मिक मान्यतेनुसार साप घरात येण्याचे काही संकेत असतात. त्याचे शुभ अशुभ प्रभाव जाणवतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • घरामध्ये काळा साप आला तर तुम्हाला लवकरच मोठे यश मिळेल, हे सूचित करतं. तसेच काही अपूर्ण इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग सापडतो. तसेच व्यवसाय वृद्धीसाठी शुभ मानलं जातं. पती-पत्नीच्या नात्यामध्ये वाढत्या प्रेमाचे संकेत मिळतात.
  • काळा साप बसलेला दिसला तर एखाद्या मोठ्या समस्येच्या समाप्तीचे लक्षण आहे.
  • घरामध्ये काळ्या सापाचं पिल्लं येणे देखील खूप शुभ मानले जाते. काही मोठ्या इच्छा पूर्ण होण्याचे किंवा काही महत्वाच्या कामात यश दर्शवते.
  • पांढरा साप दिसणे खूप शुभ मानले जाते. घरात आला तर खूप मोठी गोष्ट आहे. घरात आल्यावर अपार संपत्ती मिळण्याचे संकेत असतात. त्याचबरोबर सुखही मिळतं.
  • घरात पिवळा साप दिसला तर धन आणि सौंदर्य वाढवण्याचे लक्षण आहे. अचानक आर्थिक लाभही होतो.
  • घरामध्ये हिरवा साप आल्यास जीवनातील समस्या दूर होतात. समस्या पैसा, करिअर, लग्न, प्रेम किंवा इतर कोणत्याही विषयाशी संबंधित असतील.