सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण ही खगोलीय घटना आहे. मात्र ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला विशेष महत्त्व आहे. २०२२ या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण भारतात एप्रिल महिन्यात होणार आहे. भारतातून सूर्यग्रहण दिसणार की नाही यावर सुतक निर्धारित केला जातो. जर ३० एप्रिलला होणारे सूर्यग्रहण भारतात दिसलं तर त्याचा सुतक कालावधी वैध असेल. जर सूर्यग्रहण २०२२ भारतात दिसत नसेल तर, सुतक काल मानले जाणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूर्यग्रहण कसं होतं?

जेव्हा सूर्य अंशतः किंवा पूर्णतः चंद्राने झाकलेला असतो तेव्हा सूर्यग्रहण होते. या प्रकारच्या ग्रहणासाठी चंद्राला पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये येणे आवश्यक असते. सोप्या भाषेत सांगायचे तर, जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण होते. चंद्राची सावली पृथ्वीवर पडते आणि सूर्याचा काही भाग किंवा संपूर्ण भाग व्यापला जातो. खग्रास सूर्यग्रहणासाठी पृथ्वी, चंद्र आणि सूर्य एका सरळ रेषेत यावे लागतात.

Guru Uday: अस्ताला गेलेल्या गुरु ग्रहाचा एका महिन्यानंतर उदय, ‘या’ राशींना होणार फायदा

या राशीच्या लोकांनी काळजी घ्यावी!

  • मेष: मेष राशीच्या लोकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाच्या दिवशी धनाशी संबंधित कोणतेही काम टाळावे.
  • वृषभ: या राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण फार चांगले परिणाम देणारे दिसत नाही, ग्रहणाच्या दिवशी राग आणि तणाव टाळा.
  • मिथुन: मिथुन राशीच्या लोकांनी ग्रहणाच्या दिवशी कोणत्याही सामूहिक ठिकाणी जाणं टाळावं. याशिवाय नातेवाईकांवर लक्ष ठेवा.
  • कन्या: सूर्यग्रहण काळात नवीन नोकरी किंवा इतर कोणतेही काम बदलणे टाळा. केवळ कठोर परिश्रम यशाचा मार्ग मोकळा करेल.
  • तूळ: सूर्यग्रहणाचा या राशीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. याशिवाय ग्रहणकाळात कोणताही कायदेशीर वाद टाळा.
  • वृश्चिक: सूर्यग्रहणामुळे या राशीच्या लोकांना नोकरीत किंवा कामाच्या ठिकाणी समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
  • कुंभ: गुंतवणुकीत नुकसानीसह कौटुंबिक वाद होण्याची शक्यता आहे. याशिवाय कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहण्यासाठी संयम बाळगा.
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solar eclipse 2022 in april impact on these rashi rmt