खगोलशास्त्रानुशार चंद्र आणि सूर्य ग्रहण होत असलं तरी हिंदू पंचांगानुसार त्याला विशेष महत्त्व आहे. नव वर्ष २०२२ मध्ये एकूण चार ग्रहण आहेत. त्यापैकी २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण होतील. ग्रहण काळात पूजा वगैरे निषिद्ध मानले जाते हे आपणा सर्वांना माहीतच आहे. २०२२ मध्ये दोन सूर्यग्रहण होणार आहेत. पहिले सूर्यग्रहण ३० एप्रिल २०२२ रोजी होईल, तर दुसरे सूर्यग्रहण वर्षाच्या शेवटी २५ ऑक्टोबर २०२२ रोजी होईल. वर्षातील पहिले सूर्यग्रहण आंशिक असल्याचे मानले जाते. जे दक्षिण अमेरिका, पॅसिफिक महासागर, अटलांटिक आणि अंटार्क्टिकाच्या नैऋत्य भागात दिसणार आहे. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे या सूर्यग्रहणाचा धार्मिक प्रभाव आणि सुतक भारतात वैध ठरणार नाही.
पहिलं सूर्यग्रहण
तारीख: ३० एप्रिल, शनिवार
वेळ: दुपारी १२.१५ ते ०४.०७ पर्यंत
ग्रहण कसे असेल: खंडग्रास ग्रहण
कुठे दिसेल: दक्षिण/पश्चिम अमेरिका , पॅसिफिक अटलांटिक आणि अंटार्क्टिका
दुसरं सूर्यग्रहण
तारीख: २५ऑक्टोबर, शनिवार
वेळ: संध्याकाळी ०४.२९ते संध्याकाळी ०५.४२ पर्यंत
ग्रहण कसे असेल: खंडग्रास ग्रहण
कुठे दिसेल: युरोप, दक्षिण/पश्चिम आशिया, आफ्रिका आणि अटलांटिक
वर्षातील पहिले पूर्ण चंद्रग्रहण १६ मे २०२२ रोजी होणार आहे. ग्रहणाच्या वेळेबद्दल बोलायचे झाल्यास, भारतीय वेळेनुसार ते सोमवारी सकाळी ८ वाजून ५९ मिनिटं ते १० वाजून २३ मिनिटांपर्यंत असेल. वर्षातील पहिले चंद्रग्रहण दक्षिण-पश्चिम युरोप, दक्षिण-पश्चिम आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिकेचा बहुतांश भाग, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक महासागर, हिंदी महासागर, अटलांटिक आणि अंटार्क्टिका येथेही दिसणार आहे. भारतात या चंद्रग्रहणाची दृश्यमानता शून्य असल्याने त्याचा सुतक काळ येथे प्रभावी राहणार नाही.