Surya Grahan 2024: ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहणाला फार महत्त्व आहे. ग्रहणाचा प्रभाव राशीचक्रातील सर्व राशींवर कमी-जास्त प्रमाणात दिसून येतो. वर्षातील पहिले सूर्यग्रहण नवरात्र सुरू होण्याच्या ठीक एक दिवस आधी म्हणजे ८ एप्रिलला होत आहे. ग्रहणाच्या एक दिवसानंतर ९ एप्रिलला चैत्र नवरात्रीला प्रारंभ होत आहे. यावेळी मीन राशीमध्ये सूर्यदेव, बुधदेव, राहू आणि शुक्र स्थित असणार आहेत. यांचा संयोग अतिशय शुभ ठरणार आहे. यावेळी ४ ग्रह एकाच राशीत असल्याने सूर्यग्रहणाला ‘चतुर्ग्रही योग’ निर्माण होत आहे. हा शुभ संयोग तब्बल ५०० वर्षांनी घडत आहे. त्यामुळे काही राशींना शुभ परिणाम मिळण्याची शक्यता आहे. त्यांना आयुष्यात अपार यश, पैसा, सुख मिळण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘या’ राशींना मिळणार सुख?

मेष राशी

सूर्यग्रहणाला होत असलेला चार ग्रहांचा संयोग मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकते. तसेच नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकतात. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी अनेक नवीन संधी मिळू शकतात, ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या करिअरमध्ये प्रगती करु शकाल. या काळात तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता.

(हे ही वाचा : गुढीपाडव्यापासून ‘या’ ३ राशी होतील श्रीमंत? नववर्षात शनिदेवाच्या कृपेने उत्पन्नात होऊ शकते प्रचंड वाढ )

सिंह राशी

चार ग्रहांचा संयोग सिंह राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरु शकते. परदेशातूनही तुम्हाला चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला उत्पन्नाचे आणखी नवे स्त्रोत देखील मिळू शकतात. करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. दुसऱ्या कंपनीकडून चांगल्या पगाराची ऑफर मिळू शकते. समाजात तुमचा सन्मान वाढू शकतो. सरकारी क्षेत्राशी संबंधित लोकांना पद, प्रतिष्ठा इत्यादी फायदे मिळू शकतात.

धनु राशी

सूर्यग्रहणाला होत असलेला चार ग्रहांचा संयोग धनु राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरु शकते. व्यवसायामध्ये यश मिळण्याची दाट शक्यता आहे. करिअर आणि व्यवसायामध्ये देखील यश मिळू शकतो. त्यामध्ये चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. येणारे दिवस सुख-समृद्धी आणि भरभराटीने जाण्याची शक्यता आहे. तुम्हाला उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत देखील मिळू शकतात. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतात.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)