या वर्षातलं म्हणजेच २०२२ मधलं शेवटचं सूर्यग्रहण २५ ऑक्टोबर २०२२ रोजी होणार आहे. २७ वर्षानंतर पहिल्यांदाच दिवाळी आणि ग्रहण एकाच कालावधीत येणार आहे. कार्तिक अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते. यावर्षी कार्तिक अमावस्या म्हणजेच दिवाळीची तिथी २४ आणि २५ ऑक्टोबर रोजी आहे. श्री कल्लाजी वैदिक विश्वविद्यालयाचे ज्योतिष विभागाचे अध्यक्ष डॉ. मृत्यूंजय तिवारींच्या सांगण्यानुसार, कार्तिक अमावस्येची तिथी २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाचून २७ मिनिटांपासून सुरु होत आहे. ही तिथी २५ ऑक्टोबरला सायंकाळी चार वाजून १८ मिनिटांपर्यंत कायम राहणार आहे. सूर्यग्रहणाचा सूतक काळ १२ तास आधी म्हणजेच २४ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून सुरु झाला आहे.
हे सूर्यग्रहण आंशिक स्वरुपाचं म्हणजेच खंडग्रास सूर्यग्रहण आहे. हे या वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण आहे. या ग्रहणाचा सूतक कालावधी २४ ऑक्टोबर म्हणजेच दिवाळीच्या रात्री २ वाजून ३० मिनिटांपासून २५ ऑक्टोबर सायंकाळी चार वाजून २२ मिनिटांपर्यंत असणार आहे.
हे सूर्यग्रहण भारतामध्ये आंशिक स्वरुपात दिसणार असून त्याची सुरुवात २५ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजून २९ मिनिटांनी होईल. ग्रहण सायंकाळी सहा वाजून ३२ मिनिटांनी संपेल. म्हणजेच सूर्यग्रहणाचा संपूर्ण कालावधी चार तास तीन मिनिटांचा असेल. यापूर्वी असं २७ वर्षांआधी म्हणजेच १९९५ साली घडलं होतं जेव्हा दिवाळीमध्येच सूर्यग्रहण झालेलं.
हे सूर्यग्रहण तूळ राशीत आणि स्वाति नक्षत्रात लागणार आहे. त्यामुळेच स्वाति नक्षत्रामध्ये जन्म झालेल्या लोकांनी हे सूर्यग्रहण पाहू नये असं सांगितलं जात आहे. स्वातिन नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींसाठी हे ग्रहण लाभदायक ठरणार नाही असं सांगितलं जात आहे. म्हणजेच स्वाति नक्षत्रामधील व्यक्तींनी हे ग्रहण पाहिल्यास त्यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अमावस्येच्या तिथीमध्ये आंशिक सूर्यग्रहण होतं. याला खंडग्रास सूर्यग्रहणी म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार अशा ग्रहणाच्या वेळेस सूर्य आणि पृथ्वीदरम्यानचं अंतर सर्वाधिक असतं. सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्याच्या वाटेत चंद्र आड येतो. त्यामुळेच सूर्याचा काही भाग दिसत नाही.
पाठोपाठ चंद्रग्रहणही दिसणार
खंडग्रास सूर्यग्रहणानंतर १४ दिवसांनी मंगळवार, ८ नोव्हेंबर रोजी होणारे चंद्रग्रहणही भारतातून दिसणार आहे. त्या दिवशी ग्रहणातच चंद्र उगवताना दिसणार आहे. यावर्षी दीपावलीमध्ये जरी सूर्यग्रहण येत असले तरी २५ ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहणाच्या दिवशी कोणताही सण नाही. यामुळेच सूर्यग्रहण पाहण्याची नामी संधी मिळणार आहे.