Surya Transit In Tula: ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा एक ग्रह मूळ राशीतून इतर राशीत गोचर करतो तेव्हा त्याचा थेट परिणाम हा मानवी जीवनावर दिसून येतो. यावेळेस ग्रहांचा राजा म्हणजेच सूर्य देव गोचर करणार आहे. येत्या दिवाळीत २५ ऑक्टोबरला सूर्यग्रहण (Solar Eclipse) असणार आहे यानंतर सूर्य गोचर करून तूळ राशीत प्रवेश घेणार आहेत. सूर्याच्या प्रभावाने तूळ राशीसह अन्यही राशींवर मोठा प्रभाव दिसून येणार आहे. दरम्यान राशीचक्रातील तीन अशा भाग्यवान राशी आहेत ज्यांना सूर्याच्या गोचरने धनलाभाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. नोकरी व करिअरमध्ये प्रगतीचे सर्व योग जुळवून सूर्याचे हे गोचर तीन राशींसाठी अत्यंत शुभ ठरू शकते. या राशी कोणत्या व त्यांना नेमका कसा फायदा होणार हे आपण जाणून घेऊयात..

वृश्चिक

सूर्याने तूळ राशीत गोचर करताच वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी ‘अच्छे दिन’ सुरु होणार आहेत. नोकरी व व्यवसाय करणाऱ्यांना प्रगतीचा मोठा योग आहे. बेरोजगारांनी यावेळी थोडा जोर लावल्यास त्यांना मनासारखी नोकरी मिळू शकते. ऑफिसमध्ये तुमची प्रशंसा झाल्याने कामाचा हुरूप वाढेल. तुमच्या आई वडिलांसह काही कारणाने खटके उडाले असल्यास यावरही समाधान मिळण्याची शक्यता आहे मात्र तुम्हला आठवडा पुढाकार घ्यावा लागेल. करिअरमध्ये प्रगती होत असल्याने लक्ष्मीची कृपा राहील. तुमच्या व्यवसाय संबंधित समस्यांवर सूर्याचे गोचर शुभ परिणाम दर्शवेल तसेच याच वेळी मंगळही वक्री होणार असल्याने सोन्याहून पिवळे योग आहेत.

कर्क

तूळ राशीत गोचरासह सूर्यदेव कर्क राशीच्या प्रभाव क्षेत्रात दुसऱ्या स्थानी विराजमान होणार आहेत. कर्क राशीच्या व्यक्तींना प्रलंबित पण तरीही अचानक होणाऱ्या धनलाभाने आनंद मिळू शकतो. विशेषतः जर आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर फायद्याची संधी आहे. सूर्याच्या प्रभावाने तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. तुम्ही साहसी खेळांचा अनुभव घेऊ शकता पण यावेळी आवश्यक खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. राजकारण व शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ शुभ ठरू शकतो. तुमच्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी तुम्ही थोडी मेहनत करणे आवश्यक आहे पण तुम्हाला यावेळी नशिबाची योग्य ती साथ लाभू शकते.

तूळ

सूर्याचे गोचर तूळ राशीत होणार आहे, त्यामुळे या राशीसाठी सर्वाधिक येणारा काळ अत्यंत शुभ ठरू शकतो. वाहन व प्रॉपर्टीच्या खरेदीसाठी शुभ योग आहे त्यामुळे जर तुम्ही गुंतवणूक करू इच्छित असाल तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन नक्कीच निर्णय घेऊ शकता. सूर्य देव तूळ राशीच्या प्रभाव कक्षेत ११ व्या स्थानी विराजमान असणार आहे हे अत्यंत शुभ स्थान मानले जात असल्याने आर्थिक, सामाजिक व शारीरिक बाबींमध्ये तुम्हाला मनानुसार प्रभाव दिसून येईल. आपण संततीप्राप्तीसाठी प्रयत्न करत असाल तर यंदा गोड बातमी मिळण्याची शक्यता आहे. कोर्टाचे प्रलंबित खटले सुद्धा तुमच्या बाजूने लागू शकतात.

३३ कोटी देव खरंच असतात का? देवांची नावं काय? वेद- पुराणात दिलेलं सोपं उत्तर पाहा

(टीप- वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे. यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)