Somvati Amavasya 2023: हिंदू धर्मामध्ये सोमवती अमावस्येचा दिवस खास मानला जातो. आज २० फेब्रुवारीला या वर्षातील पहिली सोमवती अमावस्या आहे. सोमवती अमावस्येचे व्रत आणि पूजा केल्याने पुण्य प्राप्त होते. या दिवशी विवाहीत स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. या अमावस्येच्या दिवशी भगवान शंकराची उपासना केली जाते. सोमवती अमावस्येचा योग प्रामुख्याने एक ते दोन वेळा येत असतो. या वर्षी हा योग पहाटे ३.५७ पासून सुरु होणार असून रात्री ११.०३ संपणार आहे. सोमवारी अमावस्येला बरेचसे लोक उपवास देखील करतात.
सोमवती अमावस्येच्या तिथीला गंगा स्नान करणे शुभ मानले जाते. रावणाने सोमवती अमावस्येला कठोर तपस्या करत शंकराला प्रसन्न केले होते. तेव्हा त्याने शिव तांडव स्तोत्राची रचना करत शिवाची स्तृती केली होती. रावणाद्वारे रचल्या गेलेल्या या स्तोत्रांना रावण तांडव स्तोत्र असेही म्हटले जाते. रावणाने दाखवलेल्या भक्तीवर प्रसन्न होत महादेवाने त्याला तिन्ही लोकांचा स्वामी होण्याचे वरदान दिले होते. या वरदानामुळे रावणाने देवांचा राजा इंद्राला देखील आव्हान दिले होते.
आणखी वाचा – गुढीपाडव्यापासून ‘या’ राशींना होणार प्रचंड धनलाभ? नववर्षात शनिदेव देतील अपार श्रीमंती
आजची सोमवती अमावस्येच्या तिथी खूप महत्त्वपूर्ण आहे. या तिथीमध्ये परिघ योग आणि शिव योग यांचा विशेष संयोग आहे. हा योग खूप वर्षांनंतर येतो असे म्हटले जाते. आजच्या अमावस्येचा विशेष संयोग २५५ वर्षांनी आला असल्याची माहिती अनेक ज्योतिषाचाऱ्यांनी दिली आहे. या योगामध्ये गंगा नदीमध्ये स्नान केल्यास शत्रूवर विजय मिळवता येईल. या काळामध्ये शिवलिंगावर अभिषेक करणे फलदायी आहे. शनिदेव या योगाचे स्वामी आहेत असे सांगितले जाते.
आणखी वाचा – शेकडो वर्षांनी तीन राजयोग एकत्र बनल्याने ‘या’ ४ राशी होणार श्रीमंत? शनी- गुरु- शुक्र देणार धनलाभाची संधी
आपल्याकडे पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटसावित्रीच्या दिवशी उपवास करतात. वटसावित्रीप्रमाणे सोमवती अमावस्येला देखील उपवास केल्याने पतीचे आयुष्य वाढते अशी धारणा आहे. या दिवशी व्रत केल्याने लाभ होऊ शकतो.