Nag Panchami 2022 Date: नागपंचमी दरवर्षी श्रावण शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरी केली जाते. यावेळी नागपंचमी श्रावणाच्या पहिल्या सोमवारनंतर साजरी केली जाईल. हिंदू कॅलेंडरनुसार, यावर्षी नागपंचमी २ ऑगस्ट रोजी आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी नाग देवतेची पूजा केली जाते. या दिवशी काल सर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी विशेष उपाय केल्यास फायदा होतो, असे ज्योतिष शास्त्राच्या तज्ज्ञांचे मत आहे. यावर्षी नागपंचमी दिवशी विशेष योग बनत आहेत. नागपंचमीच्या दिवशी या वेळी कोणते शुभ आणि विशेष संयोग बनत आहेत आणि या दिवशी कोणते काम करू नये हे जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपंचमी २०२२ शुभ योग

ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी नागपंचमीचा दिवस मंगळवारी येत आहे. खरं तर नागपंचमीचा दिवस मंगळवार असल्याने संजीवनी योग तयार होत आहे. यासोबतच या दिवशी पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आणि हस्त नक्षत्राचाही विशेष योगायोग होत आहे. याशिवाय या दिवशी रवियोग आणि सिद्धी योगाचाही विशेष योग आहे. नागपंचमीच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त पहाटे ५.४३ ते ८.२३ पर्यंत आहे. दुसरीकडे, पंचमी तिथी १ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५.१३ पासून सुरू होत आहे, जी दुसऱ्या दिवशी म्हणजे २ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५.४१ पर्यंत राहील.

( हे ही वाचा: Budh Gochar: १ ऑगस्टपासून ‘या’ राशींचे शुभ दिवस सुरू होतील; बुध ग्रहाचा वर्षाव होईल)

नागपंचमीच्या दिवशी चुकूनही हे काम करू नका

धार्मिक शास्त्रानुसार नागपंचमीच्या दिवशी नागांना इजा पोहोचवू नये, तर त्यांची पूजा करून त्यांचे रक्षण करावे. यासोबतच या दिवशी जिवंत सापाला कधीही दूध देऊ नका, त्यांच्यासाठी दूध हे विष मानले जाते. अशा स्थितीत त्यांच्या वतीने पूजा करून मूर्तीवरच दुधाचा अभिषेक करणे योग्य मानले जाते.

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special yog is happening on nag panchami dont do this things by mistake gps
Show comments