धार्मिक शास्त्रांमध्ये दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांशी संबंधित अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या घटना सुख-शांती-समृद्धी, धन-संपत्ती, मान-सन्मान, आरोग्य, सौभाग्य-दुर्भाग्य इत्यादींशी संबंधित महत्त्वाचे संकेत देतात. दैनंदिन जीवनात घडणाऱ्या या घटनांवर संपूर्ण शकुन शास्त्र लिहिले गेले आहे. त्याचबरोबर शकुन शास्त्रामध्ये प्राणी आणि पक्ष्यांशी संबंधित संकेत विशेष महत्त्वाचे मानली गेले आहेत, ज्यामध्ये कबुतराचाही समावेश आहे. या जाणून घेऊ या शकुन शास्त्रानुसार कबुतराशी संबंधित काही शुभ आणि अशुभ संकेत…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घरात कबुतराच्या येणे नक्की कसला संकेत आहे?

शकुन शास्त्रानुसार घरामध्ये कबुतराचे आगमन हा शुभ संकेत आहे. शकुन शास्त्रामध्ये कबुतराला माता लक्ष्मीचा भक्त मानण्यात आले आहे, त्यामुळे असे मानले जाते की, जर कबुतर घराच्या छतावर किंवा बाल्कनीत बसले तर माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला धन किंवा अन्य कोणताही लाभ मिळू शकतो.

हे सूचित करते की तुमच्या आयुष्यात खूप आनंद आणि समृद्धी येणार आहे. कबुतर घरात आल्यावर त्याला खायला द्या. पण, जर कबुतर तुमच्या घरावर घरटे बांधत असेल तर त्याला तसे करण्यापासून रोखा. हे अशुभ लक्षण मानले जाते.

हेही वाचा – कोणत्याही व्यक्तीसाठी ‘या’ चार ठिकाणी राहणे म्हणजे मूर्खपणा? जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीती

शकुन शास्त्रानुसार घरामध्ये कबुतराचे घरटे करणे अशुभ संकेत दर्शवते. असे मानले जाते की, घरटे बांधल्याने घरातील सदस्यांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होतो. यासोबतच घरात राहणाऱ्या लोकांना इतरही अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अशा परिस्थितीत घरात या पक्ष्याचे घरटे दिसताच ते लगेच काढून टाकावे.

हेही वाचा – वडील आणि मुलामध्ये नाते कसे असावे? जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीती

कबुतराशी संबंधित इतर समजुती

या सगळ्या व्यतिरिक्त ज्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू दोष आहे त्यांनी घराच्या अंगणात कबुतरांना खायला द्यावे असा समज आहे. याने राहू ग्रह दोष दूर होतो. यासोबतच प्रेमविवाह करू इच्छिणाऱ्या लोकांना शकुन शास्त्रामध्ये कबुतरांना खायला घालण्याचा सल्ला दिला जातो. असे केल्याने विवाह किंवा प्रेम संबंधात येणाऱ्या अडचणी दूर होतात असे मानले जाते.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spiritual meaning of pigeon coming into house know from shakun shastra snk