Palmistry Money Line: असं म्हणतात की प्रत्येकाचे नशीब त्याच्या हातात लिहिलेले असते. हातामध्ये अनेक प्रकारच्या रेषा असतात. ज्यामध्ये मुख्य रेषा म्हणजे धन रेखा, आयु रेखा आणि भाग्य रेखा असतात. या रेखांचे विश्लेषण करून माणूस आयुष्यात किती आणि केव्हा कमावतो हे समजू शकतं. इथं आम्ही तुम्हाला अशा लोकांबद्दल सांगणार आहोत ज्यांना सासरकडून पैसे मिळतात. जाणून घेऊया…
वर्तुळाकार चिन्ह:
हस्तरेषा शास्त्रानुसार, ज्या लोकांच्या गुरूच्या पर्वतावर वर्तुळाकार चिन्ह असते, ते जीवनात अपार धन-संपत्तीचे स्वामी बनतात. हे लोक स्वतःच्या परिश्रमाने भरपूर पैसाही कमावतात. त्याचबरोबर या लोकांना सासरच्या लोकांकडून भरपूर संपत्ती आणि धनही मिळते.
हस्तरेषा शास्त्रानुसार, सासरच्या लोकांकडून धन आणि संपत्ती मिळविण्याच्या बाबतीत शनी पर्वताचीही भूमिका महत्त्वाची असते. ज्या लोकांच्या तळहातावर शनीच्या पर्वतावर वर्तुळाकार चिन्ह असते, त्यांनाही अचानक धनप्राप्ती होते. हे पैसे सासरच्या मंडळींकडून मिळू शकतात किंवा लॉटरी वगैरे लावूनही चांगला धनलाभ होतो.
आणखी वाचा : शनिदेव पुन्हा मकर राशीत प्रवेश करणार; मिथुन, तूळ आणि या राशींना प्रचंड त्रास होऊ शकतो!
सूर्य पर्वतावरील चिन्ह :
जर सूर्य पर्वतावर वर्तुळाकार चिन्ह असेल तर ती व्यक्ती उच्च आणि सात्विक विचारांची असते. अशा व्यक्तीला त्याच्या कर्माने सर्व जगात प्रसिद्धी मिळते. अशा लोकांना सासरच्या लोकांकडून भरपूर संपत्ती मिळते. पण हे लोक संन्यासीही आहेत. तसंच हे लोक मालमत्ता नाकारतात. कारण हे लोक गर्विष्ठ असतात.
जर चंद्राच्या पर्वतावर वर्तुळ असेल तर ते व्यक्तीचे आरोग्य कमकुवत करते. हे लोक खूप भावूकही असतात. हे लोक छोट्या छोट्या गोष्टीवरून भावूक होतात. हे लोक आपल्या जोडीदाराची खूप काळजी घेतात. पण हे लोक शांतताप्रिय आहेत. ते भांडणापासून दूर राहतात.
आणखी वाचा : आता आयुष्याची अजून किती वर्षे उरली आहेत? अशा प्रकारे जाणून घ्या
हस्तरेषा शास्त्रानुसार बुध पर्वतावर वर्तुळ असल्यास व्यवसायात चांगला नफा मिळतो. असे लोक व्यवसायातून भरपूर पैसे कमावतात. हे लोक व्यावसायिक विचारांचे असतात. तसंच हे लोक व्यवसायात नवीन कल्पनांमधून पैसे कमवतात. हे लोक मेहनती आणि कष्टाळू असतात. आपले ध्येय साध्य होईपर्यंत ते स्वस्थ बसत नाहीत.