Shukraditya Raja Yoga: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे अनेकदा शुभयोग आणि राजयोग निर्माण होतात. त्याचा प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. १६ ऑगस्ट रोजी ग्रहांचा राजा सूर्याचे सिंह राशीत प्रवेश केला असून, या राशीत शुक्र आधीपासून विराजमान आहे. त्यामुळे आता सिंह राशीत शुक्रादित्य राजयोग निर्माण झाला आहे. या राजयोगाच्या प्रभावाने काही राशींच्या लोकांना त्याचा चांगला फायदा पाहायला मिळेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला धन, संपत्ती, सौंदर्य, भौतिक सुख व आकर्षणाचा कारक ग्रह मानले जाते. तसेच सूर्य ग्रहाला आत्मविश्वास, मान-सन्मानाचा कारक ग्रह, असेही म्हटले जाते. त्यामुळे येत्या काळात काही राशींच्या व्यक्तींना शुक्र आणि सूर्यासंबंधित गोष्टी प्राप्त होतील.

‘शुक्रादित्य राजयोग’ करणार मालामाल (shukraditya Raja Yoga)

मेष

‘शुक्रादित्य राजयोग’ सिंह राशीत निर्माण होत असल्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींना हा काळ खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात भौतिक सुखाची प्राप्ती होईल. मान-सन्मान मिळेल. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल.

कर्क

सिंह राशीत निर्माण झालेल्या शुक्रादित्य राजयोगाच्या प्रभावाने कर्क राशीच्या व्यक्तींना खूप सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. धार्मिक कार्यात मन रमेल. वाणीवर संयम ठेवाल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नोकरी, व्यवसायात अनपेक्षित बदल घडून येतील. आयुष्यात समाधान प्राप्त होईल. आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती सुधारेल. वाणीवर नियंत्रण राहील; ज्यामुळे लोकांवर प्रभाव पडेल.

हेही वाचा: यश, कीर्ती अन् पैसा मिळणार; बुधाच्या राशी परिवर्तनामुळे ‘या’ तीन राशीचे व्यक्ती होणार मालामाल

सिंह

शुक्रादित्य राजयोगाच्या प्रभावाने या सिंह राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात अनेक अनपेक्षित बदल घडून येतील. या काळात तुमच्या आयुष्यातील अनेक संकटांवर तुम्ही सहज मात कराल, धन-संपत्तीचे सुख मिळेल. तसेच उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील. समाजात मानसम्मान वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sukraditya raja yoga the grace of goddess lakshmi will be on the persons of these three zodiac signs sap