Navpancham Rajyog 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी राशी किंवा नक्षत्र परिवर्तन करत असतो. याचा प्रभाव कमी अधिक तसेच शुभ- अशुभ स्वरूपात समस्त मानवी जीवनावर दिसून येत असतो. जेव्हा काही ग्रह एकाच राशीत एकाच रांगेत येतात तेव्हा त्यातून काही राजयोग सुद्धा तयार होतात. येत्या काही दिवसात तब्ब्ल ३०० वर्षांनी एक अत्यंत शुभ व अदभूत असा नवपंचम राजयोग तयार होत आहे. शनी व मंगळ यांच्या युतीत सूर्याचा प्रभाव पडून अगोदरच निर्माण झालेला नवपंचम राजयोग आणखी प्रबळ होणार आहे. यामुळे येत्या काळात काही राशींच्या भाग्यात शुभ प्रभाव दिसून येऊ शकतो. तीन राशींचे भाग्य रातोरात उजळण्याची चिन्हे आहेत. या मंडळींच्या नशिबात बलाढ्य धनलाभ व प्रचंड श्रीमंतीसह प्रगतीचे योग आहेत. या राशींना नेमका कोणत्या रूपात लाभ होऊ शकतो हे जाणून घ्या…
मेष रास (Aries Zodiac)
नवपंचम राजयोग तयार होताना मेष राशीच्या गोचर कुंडलीत मन स्थानी शनिदेव आहेत. तर लग्न स्थानी शुक्र व राहू स्थिर आहेत. यामुळे आपल्या कामांसह, वैवाहिक जीवनावर सुद्धा प्रभाव दिसून येऊ शकतो. येत्या काळात तुम्हाला नव्या कामाची सुरुवात करता येऊ शकते व त्यातून तुम्हाला मनःशांती लाभू शकते. दूध, दही, पाणी व पनीर या दुग्धजन्य पदार्थांशी संबंधित काम करणाऱ्या मंडळींना या काळात प्रचंड लाभ होऊ शकतो. तुम्हाला आईच्या माध्यमातून पैसे कमवण्याची संधी आहे. भांडणे टाळा.
मिथुन रास (Gemini Zodiac)
नवपंचम राजयोग हा आपल्या राशीसाठी अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतो. आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत आर्थिक स्थैर्य, कुटुंब व करिअर स्थानी चंद्राचा प्रभाव असणार आहे. त्यामुळे तुमच्या मार्गातील अडथळॆ दूर होण्यास मदत होईल. तुम्हाला मागे खेचणाऱ्या मित्रांचा खरा चेहरा समोर येऊ शकतो. यावेळी तुम्ही स्वतःला सांभाळणे गरजेचे आहे. तुमच्यावर प्रेम करणारी मंडळी तुमचे मनोबल वाढवतील. १५ एप्रिल पासून आपल्या भाग्यात प्रचडण धनप्राप्तीची चिन्हे दिसत आहेत. तुम्हाला नोकरी बदल करावा लागू शकतो.
कर्क रास (Cancer Zodiac)
कर्क राशीसाठी नवपंचम राजयोगाने आयुष्यात एक नवीन सुरवात करण्याची संधी लाभू शकते. आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत चंद्र देव हे लग्न स्थानी विराजमान आहेत. या येत्या काही महिन्यामध्ये तुमच्या व्यक्तिमत्वाला झळाळी देण्याचे काम आपल्याला करावे लागेल. वाणीमध्ये गोडवा व कामात थोडा उत्साह वाढू शकतो यामुळे तुमच्या पदरी मोठे सुख व प्रचंड लाभ पडण्याची शक्यता आहे. मन शांत असल्याने तुम्हाला अनेक संकटे भासणारही नाहीत. देवगुरु बृहस्पती आपल्या भाग्य स्थानी विराजमान असल्याने आपल्याला नशिबाची भक्कम साथ लाभू शकते . सूर्य व मंगळासह चंद्र व गुरु युतीने सुद्धा तुम्हाला लाभाची चिन्हे आहेत.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)