ज्योतिष शास्त्रानुसार, कुंडलीत उपस्थित असलेले सर्व ग्रह वेळोवेळी आपली राशी बदलत राहतात आणि त्याचा थेट परिणाम लोकांच्या जीवनावर होत असतो. आता ग्रहांचा राजा मानले जाणारे सूर्यदेव १८ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी १ वाजून १८ मिनिटांनी तूळ राशीत प्रवेश करणार आहेत. तर दुसरीकडे तर्कशास्त्र, अर्थशास्त्र, गणित, व्यवसाय आणि बुद्धिमत्तेचं कारक मानले जाणारे बुधदेव १९ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी १ वाजून ०६ मिनिटांनी तूळ राशीत प्रवेश करणार आहेत. यामुळे सुर्यदेव आणि बुधदेवाच्या युतीमुळे १९ ऑक्टोबर २०२३ ला ‘बुधादित्य राजयोग’ तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रात बुध आणि सूर्याची युती सर्वात प्रभावी मानली जाते. या राजयोगाचा प्रभाव सर्व राशींवर पडणार असून तीन राशी अशा आहेत, ज्याच्यांसाठी हा काळ फार लाभदायी ठरु शकतो. त्यांना धनलाभ होण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
‘या’ राशीतील लोकांचे भाग्य उजळणार?
मिथुन राशी
‘बुधादित्य राजयोग’ मिथुन राशीतील मंडळीसाठी लाभदायी ठरु शकतो. या राशीला चांगले दिवस पाहायला मिळू शकतात. हातात घेतलेल्या कामात यश मिळू शकतो. तसेच विदेश यात्रेवर जाण्याचा योग जुळून येऊ शकतो. या राशीतील लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊन कुटुंबात आनंदी वातावरण राहण्याची शक्यता आहे. हा काळ लग्न जमण्यासाठी अनुकूल ठरु शकतो.
(हे ही वाचा : पुढील ३० दिवस सिंहसह ‘या’ राशींच्या लोकांना होणार धनलाभ? सुर्यदेवाच्या गोचराने मिळू शकते सरकारी नोकरी )
सिंह राशी
सिंह राशीतील मंडळींना या काळात नोकरी आणि व्यवसायात जबरदस्त फायदा होऊ शकतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळू शकतो. गेल्या काही दिवसांपासून असलेली अडचण दूर होण्याची शक्यता आहे. या काळात पदोन्नती आणि पगारवाढ होऊ शकते. या काळात जोडीदाराची तुम्हाला चांगली साथ मिळू शकते.
धनु राशी
हा योग धनु राशीतील लोकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप चांगला ठरु शकतो. या काळात आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. यावेळी अपार संपत्तीसह जीवनात यश मिळण्याची शक्यताही वाढेल. व्यवसायात लाभ होऊ शकतो. कला संगीताशी संबंधित लोकांना प्रसिद्धी आणि कलेतून लाभ मिळू शकतो. कोर्टाच्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)