Sun and Mercury Transit: ज्योतिषशास्त्रानुसार काही ठरावीक काळानंतर प्रत्येक ग्रहाचे राशी परिवर्तन होते. या राशी परिवर्तनामुळे अनेकदा त्यांची इतर ग्रहांसोबत युती निर्माण होते; ज्यामुळे शुभ योग आणि राजयोग निर्माण होतात. या शुभ योग आणि राजयोगाचा प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात बुधादित्य राजयोगाला खूप खास मानले जाते. बुध ग्रह १४ जून रोजी मिथुन राशीत प्रवेश करणार असून, त्यानंतर १५ जून रोजी सूर्य ग्रहदेखील मिथुन राशीत प्रवेश करील; ज्यामुळे मिथुन राशीत सूर्य आणि बुध ग्रहाची युती निर्माण होऊन, या राशीत ‘बुधादित्य योग’ निर्माण होईल. हा राजयोग काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप शुभ फळ देणारा असेल.
वृषभ
वृषभ राशीच्या व्यक्तींना बुधादित्य योग खूप शुभ फळ देईल. या काळात अनेकदा आकस्मिक धनलाभ होतील. खर्चदेखील कराल. सर्व इच्छा पूर्ण होतील. करिअरमध्येही चांगले बदल पाहायला मिळतील. अडकलेले पैसे परत मिळतील. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. कुटुंबात शुभ कार्ये होतील. या काळात आरोग्य उत्तम राहील. तुम्ही सकारात्मक विचार कराल.
मिथुन
बुधादित्य योग मिथुन राशीत तयार होत असल्यामुळे हा योग मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल. अडचणींवर मात कराल. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येतील.
सिंह
या राशीच्या व्यक्तींसाठीही बुधादित्य योग उत्तम सिद्ध होईल. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. भौतिक सुखाची प्राप्ती होईल. कुटुंबातील वाद मिटतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांना धनलाभ होईल. तीर्थक्षेत्राला भेट द्याल. आर्थिक चणचण दूर होईल, तसेच वायफळ खर्च थांबतील. मुलांसोबत सहलीला जाल.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)