वैदिक ज्योतिषात ग्रहांची विशेष भूमिका आहे. सर्व ग्रह नियमित अंतराने त्यांची चिन्हे बदलतात. ग्रहांच्या राशीच्या बदलाव्यतिरिक्त, सर्व ग्रहांच्या चाली वेळोवेळी बदलत राहतात, ज्याचा प्रत्त्येकाच्या जीवनावर परिणाम होतो. पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर २०२३ मध्ये बुधादित्य राजयोग तयार होत आहे. सूर्य आणि बुध यांच्या संयोगाने तयार झालेला बुधादित्य राजयोग अत्यंत शुभ मानला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार, जेव्हाही राशींमध्ये बुधादित्य राजयोग तयार होतो तेव्हा लोकांचे भाग्य खुलते, असं मानले जाते. ११ ऑक्टोबर २०२३ रोजी सूर्य तूळ राशीत प्रवेश करताच बुधादित्य राजयोग तयार होईल. या राजयोगाचा काही राशींना फायदा होऊ शकतो. चला तर पाहूयात कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
‘या’ राशी होऊ शकतात मालामाल
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग खूप फायदेशीर ठरू शकतो. या लोकांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. कुठूनतरी अचानक पैसे मिळण्यासोबतच उत्पन्न वाढण्याचीही शक्यता आहे. व्यावसायिकांना काही विशेष काम पूर्ण करून फायदा होऊ शकतो. मीडिया, कम्युनिकेशन आणि मार्केटिंग क्षेत्राशी संबंधित लोकांनाही फायदा होऊ शकतो.
(हे ही वाचा : संकष्टी चतुर्थीनंतर लाडके बाप्पा ‘या’ राशींना देणार अमाप पैसा? ‘अमला योग’ बनल्याने धनलाभाने मिळू शकते नशिबाला कलाटणी)
धनु
बुधादित्य राजयोग धनु राशीच्या लोकांनाही अनुकूल परिणाम देऊ शकतो. या लोकांचे उत्पन्न वाढण्याची दाट शक्यता आहे. तुमचा बँक बॅलन्स वाढू शकतो. पैशांची बचत करण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकाल. या राशीच्या लोकांना उत्पन्न वाढवण्यासाठी काही नवीन मार्ग सापडू शकतात.
मकर
बुधादित्य राजयोग मकर राशीच्या लोकांना खूप लाभ देऊ शकतो. नोकरीत बढती होण्याची शक्यता आहे. व्यवसायात लाभ होऊ शकतो. प्रगतीचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी तुम्हाला सहकार्य करु शकतात. या राशीच्या लोकांना शैक्षणिक क्षेत्रात खूप फायदा होऊ शकतो. या काळात प्रत्येक कामात यश मिळू शकतो.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)