Sun and Venus Conjunction : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार धन आणि वैभवाचा दाता शुक्र ग्रहाने ३१ जुलै रोजी सिंह राशीत प्रवेश केला आहे. त्याप्रमाणे १६ ऑगस्ट रोजी ग्रहांचा राजा सूर्यदेव स्वराशीत म्हणजे सिंह राशीत प्रवेश करील. त्यामुळे सिंह राशीमध्ये शुक्र आणि सूर्याचा संयोग होणार आहे. या संयोगाचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. पण, अशा तीन राशी आहेत, की, त्या राशीधारकांच्या आयुष्यात सूर्य-शुक्र युतीमुळे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. या काळात त्यांची संपत्ती वाढू शकते. तसेच सूर्य आणि शुक्राच्या आशीर्वादाने त्यांना प्रत्येक कामात यश मिळू शकते. चला, या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊ… (venus and sun yuti 2024)

कर्क

सूर्य आणि शुक्राचा संयोग कर्क राशीधारकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी खूप मेहनत कराल, तुम्हाला अपेक्षित यशदेखील मिळेल. यावेळी, तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा दिसून येईल. तसेच, राजकारणाशी संबंधित लोकांसाठी हा काळ यशाचा ठरू शकतो. तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढू शकते. यावेळी व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळू शकतात. तसेच, तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढेल आणि त्यामुळे लोक प्रभावित होतील.

धनू

सूर्य आणि शुक्राचा संयोग धनु राशीधारकांसाठी शुभ ठरू शकतो. त्यामुळे यावेळी नशीब तुम्हाला साथ देईल. तुमच्यातील नेतृत्वगुण वाढू शकतात. तसेच, कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील आणि वैवाहिक जीवनात आनंदी आनंद असेल. या काळात तुमचा देश-विदेशांत प्रवास घडू शकतो. यावेळी तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमांत सहभागी होऊ शकता. तसेच तुमच्या नशिबात चांगल्या प्रकारची वाढ होण्याची शक्यता आहे. जी कामे तुम्हाला आतापर्यंत अवघड वाटत होती, ती आता सहजपणे पूर्ण होतील.

Read More News On Astrology : २ ऑगस्टर पंचांग : जमीन व्यवहारात लाभ अन् व्यापारात जोखमीचा धोका, कुंभसह ‘या’ राशींनी घ्या सावध पवित्रा: सर्व राशींना कसा जाईल शुक्रवार?

वृषभ

शुक्र आणि सिंह राशीची युती वृषभ राशीधारकांसाठी फलदायी ठरू शकते. या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. त्याशिवाय व्यावसायिकांना आर्थिक लाभ होईल आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये नवीन यश मिळवाल आणि तुमच्या नोकरीत तुम्हाला पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला वाहन आणि मालमत्तेचे सुख मिळू शकते. तसेच रिअल इस्टेट, जमीन व मालमत्तेशी संबंधित काम करणाऱ्यांसाठी काळ अनुकूल आहे.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader