Sun and Mars Transit : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार एप्रिल महिन्यात अत्यंत खास असणार आहे. या महिन्यात ग्रहांचा सेनापती मंगळ आणि ग्रहाचा राजा सूर्य राशी परिवर्तन करणार आहे. सूर्य देव मेष राशीमध्ये प्रवेश करणार तर मंगळ ग्रह मिथुन राशीतून कर्क राशीमध्ये प्रवेश करेन ज्यामुळे काही राशींचे नशीब चमकू शकते. तसेच काही राशींच्या धन संपत्तीमध्ये अपार वाढ होऊ शकते. जाणून घेऊ या त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत.
मेष राशी (Aries Zodiac)
मेष राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि मंगळचा गोचर लाभदायक ठरू शकतो. कारण मंगळ ग्रह या राशीच्या चतुर्थ भावात आणि सूर्य देव या राशीच्या लग्न भावात विराजमान होणार आहे. त्यामुळे हा काळ या राशींना भौतिक सुख सुविधा प्राप्त करण्यास मदत करेन. या दरम्यान हे लोक धाडसी निर्णय घेतील. या लोकांच्या आर्थिक बाबींमध्ये सुधारणा दिसून येईल. समाजात मान सन्मान वाढणार. नात्यात मजबुती दिसून येईल. तसेच कौटुंबिक जीवनात शांती लाभेल. या दरम्यान हे लोक वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करू शकतात.
मीन राशी (Meen Zodiac)
सूर्य आणि मंगळाचे राशी परिवर्तन य लोकांसाठी सकारात्मक ठरू शकते. कारण सूर्य देव या राशीच्या धन भावात आणि मंगळ ग्रह पंचम भावात विराजमान राहणार आहे. त्यामुळे या वेळी या लोकांना अचानक धन लाभ होऊ शकते. तसेच हे लोक गुंतवणूक करण्याचा विचार करत असेल व्यावसायिक योजनांविषयी जाणून घेता येते. हा काळ गुंतवणूक सुरू करण्यासाठी उत्तम आहे. तसेच या दरम्यान या लोकांना अपत्याशी संबंधित शुभ वार्ता मिळू शकते. या दरम्यान या लोकांच्या वाणीमध्ये प्रभाव वाढेन. तसेच गुंतवणूक किंवा प्रॉपर्टीशी संबंधित निर्णय फायदेशीर ठरू शकतात.
तुला राशी (Tula Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन फायदेशीर ठरू शकते. कारण मंगळ ग्रह आपल्या राशीच्या कर्म भावात तर सूर्य देव या राशीच्या गोचर कुंडलीमध्ये सप्तम भावात विराजमान राहणार आहे. त्यामुळे या दरम्यान या लोकांच्या काम आणि व्यवसायात भरपूर लाभ मिळू शकतो. तसेच समाजात या लोकांचा मान सन्मान तसेच प्रतिष्ठा मिळू शकते. व्यवसायात नफा मिळू शकतो. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन उत्तम राहीन. या दरम्यान नोकरीच्या शोधात असणार्या लोकांना नोकरी मिळू शकते. तसेच जुने वादविवाद दूर होऊ शकतात. सिंगल लोकांना त्यांचा जोडीदार मिळू शकतो.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)