Surya Gochar In Leo: ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. १७ ऑगस्ट रोजी सूर्य स्वतःच्या राशीत म्हणजेच सिंह राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. पण अशा ४ राशी आहेत, ज्यांनी यावेळी खूप काळजी घेणं आवश्यक आहे. चला जाणून घेऊया या राशींबद्दल..
मकर राशी
सूर्यदेवाचे संक्रमण होताच मकर लोकांनी थोडे सावध राहणे आवश्यक आहे. कारण सूर्य देव तुमच्या संक्रमण कुंडलीतून आठव्या भावात प्रवेश करणार आहे. त्यामुळे यावेळी आरोग्याबाबत विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. तसेच करिअरबाबत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका याने तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. तसेच मालमत्तेमध्ये किंवा एखाद्या व्यवसायात गुंतवणूक करणे टाळा. त्याचबरोबर तुमच्या राशीचा स्वामी शनिदेव आहे आणि ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेव आणि सूर्यदेव यांच्यात शत्रुत्वाची भावना आहे. त्यामुळे या काळात विशेष काळजी घेणं चांगलं आहे.
( हे ही वाचा: Saturn Transist: शनिदेव ‘या’ राशींच्या कुंडलीत बनवत आहेत महापुरुष राजयोग; ऑक्टोबरपर्यंत कोणतीही वाईट गोष्ट घडणार नाही)
कुंभ राशी
सूर्यदेवाचे संक्रमण तुमच्यासाठी थोडे त्रासदायक ठरू शकते. कारण तुमच्या राशीतून सूर्य देव सातव्या भावात प्रवेश करत आहे. त्यामुळे यावेळी तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडथळे निर्माण होऊ शकतात. तसेच जर तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर सध्या हा विषय थांबवा. कारण यामुळे मोठा तोटा होण्याची शक्यता आहे. तुमच्या राशीचा स्वामी शनिदेव असून सूर्यदेव आणि शनि ग्रह यांच्यात वैराची भावना आहे. त्यामुळे यावेळी स्वतःची काळजी घ्या.
वृषभ राशी
सूर्यदेवाच्या संक्रमणाबाबत तुम्ही लोकांना थोडे सावध राहावे लागेल. कारण सूर्य देवाचे संक्रमण तुमच्या राशीतून चतुर्थ स्थानात असेल. यामुळे यावेळी आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच महत्त्वाची कामे आता थांबू शकतात. त्यामुळे घाबरून जाऊ नका. नंतर ती कामे पूर्ण होतील. घरातील सदस्यांशी मतभेद होऊ शकतात. त्याच वेळी, कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी संबंध बिघडू शकतात. त्यामुळे यावेळी रागावर संयम ठेवा म्हणजे सर्व कामे मार्गी लागतील.
( हे ही वाचा: Shukra Gochar 2022: ३१ ऑगस्टपर्यंत ‘या’ चार राशीच्या लोकांच्या आयुष्यात होईल बदल; लवकरच मिळेल आनंदाची बातमी)
धनु राशी
सूर्य ग्रहाच्या राशीतील बदल तुमच्यासाठी थोडा त्रासदायक ठरू शकतो. कारण सूर्य देवाचे संक्रमण तुमच्या राशीतून सहाव्या घरात होणार आहे. ज्याला रोग आणि शत्रूचे स्थान मानले जाते. त्यामुळे यावेळी गुप्त शत्रूंकडून तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे वेळीच सावध व्हा. तसेच लांबच्या प्रवासाला जाणे टाळावे. वैवाहिक जीवनात सुद्धा मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, वेळीच स्वतःच्या रागावर संयम ठेवला तर अनेक समस्या सुटतील.
(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)