Sun And Mangal Conjunction : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह ठराविक काळाने गोचर करतात आणि इतर ग्रहांशी युती करतात. ज्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. अशातच आता वृश्चिक राशीमध्ये सूर्य आणि मंगळ या दोन ग्रहांची युती होणार आहे. ही युती वृश्चिक राशीत होत असल्याने या युतीचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर दिसून येणार आहे. परंतु ३ राशी अशा आहेत ज्यांचे नशीब या काळात चमकू शकते तसेच त्यांची करियर आणि व्यवसायातही प्रगती होऊ शकते. तर या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
सिंह रास –
सूर्य आणि मंगळाची युती सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. कारण सूर्यदेव तुमच्या राशीचे स्वामी असून ही युती तुमच्या राशीतून चौथ्या स्थानी होत आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला सर्व भौतिक सुखांची प्राप्ती होऊ शकते. या काळात तुम्हाला संपत्तीची कमतरता भासू शकत नाही. नोकरीशी संबंधित काही नवीन प्रस्ताव मिळू शकतात. स्थावर मालमत्तेशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला ठरु शकतो.
वृश्चिक रास –
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि मंगळाची युती फायदेशीर ठरू शकते. कारण ही युती तुमच्या राशीच्या लग्न स्थानी तयार होत आहे. त्यामुळे या काळात तुमचे धैर्य आणि शौर्य वाढू शकते. याचबरोबर तुमचा आत्मविश्वासही वाढू शकतो. वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी येण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या सल्ल्याने तुम्ही चांगली कामे करू शकता. नोकरदारांना या काळात नशीबाची साथ मिळू शकते. कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यताआहे. व्यावसायिकांना या काळात चांगला नफा मिळू शकतो.
तूळ रास –
तूळ राशीच्या लोकांसाठी ही युती अनुकूल ठरू शकते. कारण ही युती तुमच्या गोचर कुंडलीच्या धन स्थानी तयार होत आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होऊन उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तसेच, तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा होऊ शकते. परदेशाशी संबंधित व्यवसाय असल्यास तुमच्याकडे नवीन प्रस्ताव येऊ शकतात. करिअर मॉडेलिंग, कला, संगीत आणि मीडियाशी संबंधित लोकांसाठी ही युती फायदेशीर ठरू शकते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)