Samsaptak RajYog 2025: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन होते; ज्याचा प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन करतो. नुकताच सूर्याचा मकर राशीत प्रवेश झाला असून तो संपूर्ण एक महिना या राशीत राहिल. तसेच दुसरीकडे मंगळ ग्रह कर्क राशीत विराजमान आहे. अशातच हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून सातव्या घरात विराजमान आहेत. ज्यामुळे समसप्तक राजयोग निर्माण होत आहे. या राजयोगाच्या प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकेल.

ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो. तसेच मंगळ ग्रहाच्या प्रभावाने व्यक्तीला साहस, आत्मविश्वास प्राप्त होतो.

Mangal rashi parivrtan 2024
येणारे ७० दिवस मंगळ करणार कृपा; ‘या’ तीन राशींची होणार चांदी
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Shani Pluto Ardhakedra Yog
२२ जानेवारीला शनि-यम निर्माण करणार शक्तीशाली योग! ‘या’ ३ राशींचे नशीब पलटणार, अचानक होईल धनलाभ
15 January 2025 Horoscope
१५ जानेवारी राशिभविष्य: आज कोणत्या राशींना लाभणार ग्रहमानाची साथ? कोणाच्या कामात सकारात्मक बदल तर कोणाला मिळेल धाडसाचे फळ
Walmik Karad Mother Parubai Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर आईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “आता मी मेल्यावर पाणी पाजायला…”
Shani gochar 2025
पुढचे १४३ दिवस शनी देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती मिळवणार प्रत्येक कामात यश
Rahu Shukra Yuti In Uttarabhadra Nakshatra
Rahu Shukra Yuti : १८ वर्षानंतर राहु शुक्र करणार युती, २८ जानेवारीपासून ‘या’ तीन राशींचे नशीब घेईल कलाटणी, होणार अपार श्रीमंत
Kark Rashi mata lakshmi
कर्क राशीमध्ये निर्माण होईल डबल लक्ष्मी राजयोग! ‘या’ ३ राशीचे भाग्य उजळणार, माता लक्ष्मीची कृपा प्रत्येक काम मिळणार अपार यश

समसप्तक राजयोग करणार मालामाल

कन्या

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी सूर्य आणि मंगळाचा समसप्तक राजयोग खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. मेहनतीचे फळ मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळेल. या काळात तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले परत पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. त्यांच्यासोबत दूरचे प्रवास घडतील.

वृश्चिक

समसप्तक राजयोग वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी ठरेल. या काळात तुमच्या आयुष्यात अनेक गोष्टी प्राप्त करण्यात सक्षम असाल. या काळात भाग्याची पुरेपुर साथ मिळेल. धार्मिक कार्यात मन रमेल. या काळात तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. तुमची आर्थिक चणचण दूर होईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल.

हेही वाचा: येणारे ७० दिवस मंगळ करणार कृपा; ‘या’ तीन राशींची होणार चांदी

धनु

धनु राशीच्या व्यक्तींसाठी समसप्तक राजयोग खूप सकारात्मक ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा -आकांक्षा पूर्ण होतील. या काळात तुम्हाला कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी चांगले यश मिळेल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.

(टीपः सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader