ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह जेव्हा राशी बदलतात तेव्हा त्याचा परिणाम सर्व दुनियेवर होतो. डिसेंबर महिन्यात अनेक ग्रहांचे बदल झाले आहेत. यामुळे काही महत्त्वाचे योग निर्माण झाले आहेत. धनु राशीत सूर्याच्या आगमनाने बुधादित्य योग तयार झाला आहे. २८ डिसेंबरपर्यंत हा शुभ योग राहील. बुध आणि सूर्य एकाच राशीत एकत्र आल्यावर बुधादित्य योग तयार होतो. तसंच शुक्र ग्रह देखील या राशीत आधीपासूनच स्थिर आहे. त्यामुळे बुध आणि शुक्र यांच्या संयोगामुळे लक्ष्मीनारायण नावाचा आणखी एक शुभ योग तयार होत आहे. हे दोन मोठे शुभ योग तयार झाल्यामुळे अनेक लोकांच्या जीवनात बदल होऊ शकतात. तसंच प्रचंड पैसा कमवण्याची संधी मिळू शकते.
हे दोन योग ‘या’ ६ राशींसाठी ठरेल शुभ
तीन ग्रहांच्या शुभ संयोगामुळे मेष, कर्क, तूळ, वृश्चिक, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांसाठी काळ चांगला जाईल. या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. मालमत्ता आणि आर्थिक बाबतीत लाभ होऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टीने वेळ उत्तम राहील. नशीब तुमच्या सोबत असू शकते. कौटुंबिक बाबींसाठीही वेळ शुभ म्हणता येईल.
‘या’ ५ राशींसाठी असेल संमिश्र काळ
तिन्ही ग्रहांच्या संयोगामुळे वृषभ, मिथुन, सिंह, कन्या आणि धनु राशीच्या लोकांसाठी संमिश्र काळ राहील. या ५ राशीच्या लोकांना पैसा तर मिळेलच पण खर्चही वाढेल. काही प्रकरणांमध्ये, तारे तुमच्या सोबत असतील, तर कामात व्यत्यय, तणाव आणि वाद होण्याचीही शक्यता आहे. आरोग्याशी संबंधित समस्याही उद्भवू शकतात.
( हे ही वाचा: १ महिन्यानंतर शनिदेव ‘या’ राशींना बनवणार श्रीमंत; २०२३ पासून मिळणार बक्कळ धनलाभाची संधी)
मकर राशीच्या लोकांनी काळजी घ्या!
सूर्य, बुध आणि शुक्र एकाच राशीत आल्याने मकर राशीच्या लोकांच्या अडचणी वाढू शकतात. कामात अडथळे येऊ शकतात. यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पैशाची हानी आणि आरोग्याशी संबंधित समस्या देखील असू शकतात. या काळात नवीन काम सुरू करणे टाळा. तसंच कर्जही घेऊ नका. कामात निष्काळजीपणा आणि घाई देखील टाळावी.
बुधादित्य योग प्रचंड पैसा मिळवून देईल
मिथुन, कन्या, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांना सूर्य आणि बुधाच्या संयोगाने तयार झालेल्या शुभ बुधादित्य योगाचा अधिक लाभ होईल. या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील. तसंच प्रचंड पैसा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय कर्क आणि मीन राशीच्या लोकांसाठी काळ शुभ राहील. तसंच शेअर बाजाराशी संबंधित लोकांसाठी हा काळ चांगला असू शकतो.
( हे ही वाचा: ‘पॉवरफुल विपरीत राजयोग’ बनल्याने ‘या’ राशी बनणार श्रीमंत? २०२३ मध्ये मिळू शकतो प्रचंड पैसा)
प्रचंड धनलाभाची संधी मिळवून देईल लक्ष्मीनारायण योग
बुध आणि शुक्र एकत्र आल्यावर लक्ष्मी नारायण योगही तयार होतो. हा योग अत्यंत शुभ मानला जातो. यामध्ये बुध ग्रहाच्या प्रभावामुळे मोठे आर्थिक व्यवहार, खरेदी आणि गुंतवणूक होते. बुद्धीवर परिणाम करणारा हा ग्रह आहे. त्याच वेळी शुक्र आनंद आणि लाभ वाढवतो. हा योग तयार झाल्याने मिथुन, कन्या, मकर, सिंह राशींना प्रचंड धनलाभ मिळण्याची शक्यता आहे. तसंच अनेक महत्त्वाच्या बातम्या देखील मिळण्याची शक्यता दिसून येत आहे.