Sun nakshatra change 2024: ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते. सूर्याचे प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन तसेच वेळोवेळी सूर्याचे नक्षत्र परिवर्तनदेखील होते. कुंडलीत सूर्य शुभ असेल, तर व्यक्तीला आयुष्यात आत्मविश्वास, यश, मान-सन्मान, पैसा, पद यांसारख्या बऱ्याच गोष्टी प्राप्त होतात. ज्योतिषशास्त्रानुसार ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजून ५६ मिनिटांनी सूर्य स्वामी नक्षत्रातून विशाखा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. सूर्याचे हे नक्षत्र परिवर्तन काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप खास मानले जाईल. सूर्याच्या या नक्षत्र परिवर्तनाने काही राशींच्या लोकांना त्याचा चांगला फायदा होईल.

सूर्याचे नक्षत्र परिवर्तन

मेष

सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने मेष राशीच्या व्यक्तींचा भाग्योदय होईल. आर्थिक परिस्थिती उत्तम होईल. करिअर आणि व्यवसायात मानासारखे यश प्रस्थापित कराल. अडकलेले पैसे परत मिळतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. आरोग्य चांगले राहील. कुटुंबीयांचे संबंध चांगले होतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता.

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींनादेखील सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाचा चांगला फायदा पाहायला मिळेल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. समाजात मान-सन्मान वाढेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. वैवाहिक जीवन सुखमय असेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल.

हेही वाचा: Narak Chaturdashi 2024 : आज साजरी केली जाईल नरक चतुर्दशी; अभ्यंग स्नानाचा शुभ मुहूर्त नेमका कधी?

u

वृश्चिक

सूर्याचे नक्षत्र परिवर्तन वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात समस्यांपासून सुटका होईल. ताणतणाव दूर होण्यास मदत होईल, मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. तूळ राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. वाहन, मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण कराल. या काळात भौतिक सुखाची प्राप्ती होईल. नवीन कार्य सुरू करण्यासाठी अनुकूल काळ आहे.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)