ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह संक्रमण करतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य, शनि आणि गुरु स्वतःच्या राशीत बसले आहेत. सूर्य हा ज्योतिषशास्त्रात राजसत्ता, प्रशासकीय सेवा, पिता आणि आत्मा यांचा कारक मानला जातो. शनि हा कर्म आणि जीवनाचा प्रदाता मानला जातो. तर गुरु ग्रह हा वृद्धी आणि संपत्तीचा कारक मानला जातो. त्यामुळे या ग्रहांचा प्रभाव राशींसोबतच देश आणि जगावर राहील. परंतु अशा ३ राशी आहेत ज्या या वेळी चांगले पैसे कमवू शकतात. चला जाणून घेऊया या राशींबद्दल..

मिथुन राशी

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याने सिंह राशीत प्रवेश केल्याने तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायात मोठे यश मिळू शकते. कारण तुमच्या संक्रमण कुंडलीत तृतीय स्थानात राजयोग तयार होत आहे. जो खूप मजबूत आहे. म्हणून, या काळात तुम्ही तुमचे धैर्य आणि सामर्थ्य वाढलेले पहाल. दुसरीकडे, तुम्ही राजकारणात सक्रिय असाल तर तुम्हाला चांगले यश मिळू शकते. तसेच, तुम्ही कोणतेही पद मिळवू शकता. यावेळी तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल.

( हे ही वाचा: २४ नोव्हेंबरपर्यंत गुरू ग्रह उलट दिशेने फिरेल; ‘या’ ३ राशींना प्रगती सोबत होईल बक्कळ धनलाभ)

कर्क राशी

सूर्य, शनि आणि गुरू राशीत असल्याने तुम्हाला चांगले धन मिळू शकते. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. दुसरीकडे देव गुरु बृहस्पती नशिबाच्या घरावर विराजमान आहेत. या काळात तुमचा मान-सन्मान वाढेल. तसेच, जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती आणि त्यासोबत वेतनवाढ मिळू शकते. यावेळी तुम्हाला कोर्ट केसमध्ये यश मिळू शकते. तसेच, जर तुमचा व्यवसाय हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, आणि खाद्यपदार्थांशी संबंधित असेल तर यावेळी तुम्ही चांगले पैसे कमवू शकता.

तूळ राशी

रवि, गुरू आणि शनि यांचे स्वतःच्या राशीत संक्रमण तुम्हाला भाग्य देऊ शकतात कारण भाग्याचा स्वामी आणि लाभाचा स्वामी तुमच्या राशीत बुधादित्य योग करत आहे. त्यामुळे या काळात तुम्ही परदेशात जाऊ शकता. तसेच, जर तुमचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगली कमाई होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही अनेक माध्यमांतून पैसे कमवण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायात चांगला नफा कमवू शकाल. या काळात एखादा महत्त्वाचा करार निश्चित होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे तुम्हाला भविष्यात चांगला नफा मिळू शकतो.

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader