Sun-Saturn conjunction in 2025: नवे वर्ष लवकरच सुरू होणार असून नव्या वर्षाच्या सुरूवातीला अनेक ग्रहांचे राशी परिवर्तन होईल. या राशी परिवर्तनाचा प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते. सूर्याचे प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन होते. कुंडलीत सूर्य शुभ असेल, तर व्यक्तीला आयुष्यात आत्मविश्वास, यश, मान-सन्मान, पैसा, पद यांसारख्या बऱ्याच गोष्टी प्राप्त होतात. तसेच अशुभ असल्यास अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागतो.
ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रहामध्ये शनी हा सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे त्यामुळे त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षाचा कालावधी लागतो. शनीच्या सूर्याबरोबरच्या कुंभ राशीतील युतीमुळे काही राशीच्या व्यक्तींना त्याचे अशुभ परिणाम पाहायला मिळतील. तर काही राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभही होईल.
पंचांगानुसार, शनी २०२५ पर्यंत आपल्या मूळ त्रिकोण कुंभ राशीतच विराजमान राहील. तसेच सूर्य १२ फेब्रुवारी २०२५ रोजी कुंभ राशीमध्ये प्रवेश करेल आणि १४ मार्चपर्यंत याच राशीत विराजमान राहील. कुंभ राशीत सूर्य-शनी एकत्र आल्याने त्यांची युती निर्माण होईल. ही युती काही राशींच्या व्यक्तींसाठी उत्तम मानली जाणार नाही.
सूर्य-शनीची युती ‘या’ तीन राशींसाठी नकारात्मक ठरणार
मिथुन
सूर्य-शनीची युती वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी नुकसानदायक ठरेल. या काळात शत्रूंपासून सावध राहा आणि मनातील गोष्टी इतरांना सांगण्याआधी विचार करा. आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे वायफळ खर्च करू नका. तसेच कुठेही गुंतवणूक करण्यापासून दूर रहा. कामाच्या ठिकाणी विणाकारण वाद घालू नका. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा.
कन्या
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी शनी-सूर्याची युती परिक्षा घेणारी ठरेल. हा काळ तुमच्यासाठी अनेक अडचणी निर्माण करणारा असेल. तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या, वाणीवर नियंत्रण ठेवा. या काळात कोणत्याही कामाकडे दुर्लक्ष करू नका. वाहन चालवताना सांभाळून चालवा. तसेच या काळाता कुटुंबात कोणतेही वाद होणार नाहीत याची काळजी घ्या.
तूळ
शनी-सूर्याची युती तूळ राशीच्या व्यक्तींसाठी तितकी लाभदायी सिद्ध होणार नाही. या काळात तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये दूरावा निर्माण होईल. तुमच्या कुटुंबातील वरिष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. आयुष्यात अडचणी निर्माण होतील. कामाच्या ठिकाणी मन लागणार नाही त्यामुळे वरिष्ठ तुमच्यावर नाराज असतील. तणावाचा सामना करावा लागेल. तसेच व्यर्थ पैसे खर्च होतील. त्यामुळे या काळात शांत राहून प्रत्येक निर्णय घ्या, कोणत्याही कामाच घाई करू नका. स्वार्थी लोकांपासून दूर रहा.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)