Sun Transit 2023: नवीन वर्षात अनेक ग्रह गोचर करून राशी परिवर्तन करणार आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा कोणताही ग्रह अन्य राशीत स्थिर होतो तेव्हा केवळ ती एकच रास नव्हे तरसर्व १२ राशींवर त्याचे शुभ- अशुभ परिणाम दिसू लागतात. काहींना हा प्रभाव अधिक तर काहींना अगदीच नगण्य जाणवतो. येत्या नववर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर सूर्य धनु राशीत गोचर करण्यासाठी सज्ज झाला आहे. यामुळे १४ जानेवारीपासून काही राशींचे भाग्य हे सूर्याच्या तेजाप्रमाणेच लखलखीत उजळण्याचे योग आहेत.
ज्योतिष शास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार १६ डिसेंबर २०२२ ते १४ जानेवारी २०२३ पर्यंत सूर्य धनु राशीत विराजमान असणार आहेत. १४ जानेवारीला सूर्य धनु राशीत गोचर करणार आहेत. यामुळे चार अशा राशी आहेत ज्यांना अमाप धनलाभ व प्रबळ प्रगतीचे योग तयार होत आहेत. या राशी नेमक्या कोणत्या व त्यांना कसा लाभ होणार हे आता आपण जाणून घेऊयात..
सूर्य गोचरने ‘या’ राशींना धनलाभाची संधी
मेष
मेष राशीसाठी सूर्याचे गोचर हे प्रचंड धनलाभ घेऊन येऊ शकते. याकाळात तुमचे प्रेमसंबंध सुधारण्यास मदत होईल. ज्यांना लग्न जुळण्यासंबंधित किंवा वैवाहिक आयुष्यात सुखप्राप्ती संबंधित तक्रारी आहेत त्यांच्यासाठी येणारा हा काळ काही शुभ वार्ता घेऊन येऊ शकतो. उच्च शिक्षणासाठी तयारी करत असलेल्यांना प्रगतीचे प्रबळ योग आहेत. तुम्हाला कुटुंबाची साथ लाभू शकते. येणाऱ्या काळात केवळ भौतिक नव्हेच तर मानसिक सुखाने सुद्धा तुमची भरभराट होऊ शकते.
कन्या
कन्या राशीच्या मंडळींना सुद्धा सूर्याच्या राशी परिवर्तनाचा लाभ होऊ शकतो. व्यवसायात प्रगतीचा प्रबळ योग आहे. तुम्हाला अडकलेले पैसे पुन्हा प्राप्त होऊ शकतात. न मागता तुमच्या मनाप्रमाणे सर्वकाही घडण्याचा हा कालावधी ठरू शकतो. तुम्हाला संयम ठेवण्याची गरज आहे. जिथे तुम्हाला चिडचिड होतेय असे वाटेल त्याठिकाणहून काढता पाय घ्या व थोडं शांत होऊन मग त्या परिस्थितीचा सामना करू शकता.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या कुंडलीत सूर्याचे गोचर अत्यंत लाभदायक स्थितीत असणार आहे. वेळ तुमच्या बाजूने असेल त्यामुळे हात घालाल त्या कामात यशप्राप्तीचे योग आहेत. लक्ष्मी तुमच्याकडे आपसूकच येऊ शकते मात्र तुम्हाला हुशारीने काम करण्याची गरज आहे. प्रमोशन व सॅलरीच्या बाबतही नशीब तुम्हाला साथ देऊ शकते. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून कौतुक व मदत मिळू शकते.
हे ही वाचा<< गजकेसरी राजयोग बनल्याने ‘या’ ३ राशींना प्रचंड धनलाभाचे योग; ३१ डिसेंबरपासून मिळू शकते तुमच्या नशिबाला कलाटणी
मीन
मीन राशीच्या मंडळींसाठी सूर्य देव गोचर करून सुखाचे दिवस घेऊन येऊ शकतात. सरकारी नोकरीच्या संधी तुमच्या दाराशी येऊ शकतात पण नीट विचार करून काम करावे. मीन राशीच्या भाग्यात धनप्राप्तीचे योग आहेत. इतकेच नव्हे तर, तुम्हाला अनेक सकारात्मक बदल अनुभवायला मिळू शकतात. विशेषतः जर आपण नोकरी बदलू इच्छित असाल तर याच वेळी एक पाऊल पुढे टाकणे हिताचे ठरेल.
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)