Sun transit 2024: ग्रहांचा राजा सूर्याला ज्योतिषशास्त्रात खूप महत्वपूर्ण मानले जाते. सूर्यदेखील इतर ग्रहांप्रमाणे त्याच्या निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन करतो; ज्याचा १२ राशींच्या व्यक्तींवर शुभ किंवा अशुभ प्रभाव पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन करतो. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो.

सूर्य सध्या वृश्चिक राशीमध्ये विराजमान असून तो लवकरच धनु राशीमध्ये प्रवेश करणार आहे. सूर्य जवळपास ३६५ दिवसांनंतर या राशीत प्रवेश करणार आहे. पंचांगानुसार सूर्य १५ डिसेंबर रोजी रात्री १० वाजून १९ मिनिटांनी धनु राशीत प्रवेश करणार असून तो १४ जानेवारी २०२५ पर्यंत या राशीत विराजमान राहील.

mangal vakri january 2025 | mangal gochar 2025
Mangal Vakri 2025 : जानेवारी महिन्यात ‘या’ राशींचे नशीब फळफळणार; मंगळ ग्रहाच्या उलट्या चालीने मिळणार अमाप संपत्ती अन् सुख
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशीसाठी ठरेल वरदान? दत्तगुरु-देवी लक्ष्मी तुमची इच्छा पूर्ण करणार का? वाचा राशिभविष्य
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार कोणाची मनोकामना आज पूर्ण होणार; वाचा तुमचे राशिभविष्य
Vinayak Chaturthi special 5th November Rashi Bhavishya
५ नोव्हेंबर पंचांग: विनायक चतुर्थीला ‘या’ राशींना होणार फायदा, भाग्याची साथ ते धनलाभाचे योग; वाचा तुमच्या नशिबात कसं येईल सुख?
Aries To Pisces 8th November Horoscope
८ नोव्हेंबर पंचांग : उत्तराषाढा नक्षत्रात रवि योगाचा शुभ संयोग! मेष, वृषभसह ‘या’ ५ राशींना मिळेल प्रत्येक कार्यात भरघोस यश; वाचा तुमचे राशिभविष्य
Aries To Pisces 7th November Horoscope In Marathi
७ नोव्हेंबर पंचांग : आज स्वामींच्या कृपेने १२ पैकी कोणत्या राशी होतील धनवान; तुमच्या आयुष्यात येतील का सुखाचे क्षण? वाचा गुरुवारचे राशिभविष्य
29th October 2024 Horoscope Today
Daily Horoscope, 29 October : धनत्रयोदशीला मेष, सिंहसह ‘या’ राशींवर होणार धन-सुखाचा वर्षाव, तुमच्यावर असणार का लक्ष्मीची कृपा? वाचा राशिभविष्य

एक वर्षानंतर सूर्य करणार गुरूच्या राशीत प्रवेश

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचे राशीपरिवर्तन अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहून, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवन सुखमय असेल. नव्या वस्तू खरेदी कराल. आई-वडीलांची पुरेपुर साथ मिळेल. मेहनतीचे फळ मिळेल. अविवाहितांची लग्ने जुळतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या मेहनतीचे कौतुक होईल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना मनासारखी नोकरी मिळेल.

तूळ

तूळ राशीच्या व्यक्तींसाठी देखील सूर्याचे राशी परिवर्तन सकारात्मक फळ देणारे ठरेल. या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. नव्या वस्तू खरेदी कराल. नोकरीत प्रमोशन मिळेल. मुलांकडून आनंदी वार्ता येतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. नवे लोक, नवे छंद यांच्याशी जोडले जाल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल.

हेही वाचा: देवी लक्ष्मी करणार मालामाल; दोन दिवसांनंतर २०२४ मधील शेवटचा ‘गुरूपुष्यामृत योग’; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना देणार बक्कळ पैसा

धनु

सूर्याचे राशी परिवर्तन धनु राशीच्या व्यक्तींसाठीही खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत मिळेल.

(टीप – सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)