Sun Transit 2024: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन होते; ज्याचा १२ प्रभाव राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन करतो. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो. इतर ग्रहांप्रमाणेच सूर्यदेखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो. सूर्याच्या परिवर्तनामुळे १२ राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंचांगानुसार, सूर्य १५ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ९ वाजून ५६ मिनिटांनी धनु राशीमध्ये प्रवेश करेल. त्यानंतर १४ जानेवारी २०२५ रोजी सूर्याचा मकर राशीत प्रवेश होईल.

सूर्याचे राशी परिवर्तन

मेष

मेष राशीत सूर्य नवव्या घरात असेल. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना भाग्याची पुरेपुर साथ मिळेल. धार्मिक कार्यात मन रमेल. या काळात तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. तुमची आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल.

वृश्चिक

वृश्चिक राशीत सूर्य दुसऱ्या घरात असेल, त्यामुळे हा काळ वृश्चिक राशीधारकांसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. त्यांच्यासोबत दूरचे प्रवास घडतील. आरोग्य चांगले राहील. गुंतवणूक करणं फायदेशीर ठरेल.

हेही वाचा: ४ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींची होणार चांदी, शनिच्या कृपेने मिळणार अपार धनसंपत्ती अन् पैसा

धनु

धनु राशीच्या सूर्य लग्न भावात असेल. या काळात तुम्हाला कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी चांगले यश मिळेल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sun transit 24 up to 14th january 25 these three zodiac signs will get sudden financial gain sap