Sun Gochar in Makar Rashi: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन होते; ज्याचा १२ प्रभाव राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन करतो. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो. इतर ग्रहांप्रमाणेच सूर्यदेखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो. सूर्याच्या परिवर्तनामुळे १२ राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात.

सध्या सूर्य धनु राशीत असून, १४ जानेवारी २०२५ रोजी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल; जो जवळपास एक महिना या राशीत राहील. सूर्य एक वर्षानंतर मकर राशीत प्रवेश करणार असून सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशाला हिंदू धर्मात खूप महत्वपूर्ण मानले जाते. या दिवशी देशभरात मकर संक्रांतीचा सणही साजरा केला जातो. तसेच हे राशी परिवर्तन काही राशींच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल.

shani gochar positive impact
आता नुसता पैसा! शनीच्या नक्षत्र परिवर्तनाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना देणार नवी नोकरी, वैवाहिक सुख अन् गडगंज श्रीमंती
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Guru-Shukra's parivartan Rajyoga
आता ‘या’ तीन राशी कमावणार बक्कळ पैसा; गुरू-शुक्राचा परिवर्तन राजयोग देणार प्रत्येक कामात यश, प्रेम अन् नुसता पैसा
Saturn and Sun Yuti 2025
शनी-सूर्याची युती बक्कळ पैसा देणार; ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती कमावणार पद, पैसा अन् मान-सन्मान
saturn transit 2025
येणारे ५६ दिवस शनी देणार गडगंज श्रीमंती; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे प्रेम संबंध अन् आर्थिक स्थिती सुधारणार
Mars Gochar 2025
पुढील ५७ दिवस मंगळ देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकणार
Shani Transit 2025
येणारे ६५ दिवस शनी देणार पैसाच पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार धन-संपत्ती आणि ऐश्वर्य
Budh gochar in makar january
आता नुसती चांदी; बुधाचा शनीच्या राशीतील प्रवेश ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकवणार, भरपूर पैसा देणार

सूर्याचा मकर राशीत प्रवेश करणार मालामाल

वृषभ

वृषभराशीच्या व्यक्तींना सूर्याचे राशी परिवर्तन खूप लाभदायी ठरेल. या काळात भाग्याची पुरेपुर साथ मिळेल. धार्मिक कार्यात मन रमेल. या काळात तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. तुमची आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल.

तूळ

तूळ राशीच्या व्यक्तींनाही सूर्याचे राशी परिवर्तन अत्यंत फायदेशीर ठरेल. या काळात तुम्हाला कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी चांगले यश मिळेल. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.

हेही वाचा: आजपासून बुधाचा जबरदस्त प्रभाव देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा आणि मानसन्मान

धनु

सूर्याचा मकर राशीतील प्रवेश धनु राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत सुखदायी असेल. हा काळ धनु राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. त्यांच्यासोबत दूरचे प्रवास घडतील. आरोग्य चांगले राहील. गुंतवणूक करणं फायदेशीर ठरेल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader