Surya Rashi Parivartan: ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो. इतर ग्रहांप्रमाणेच सूर्यदेखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो. सूर्याच्या परिवर्तनामुळे १२ राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला.
पंचांगानुसार, नुकताच सूर्याने मकर राशीमध्ये प्रवेश केला असून आता येत्या काही दिवसात तो कुंभ राशीत प्रवेश करेल. पंचांगानुसार, सूर्य १३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजून ४३ मिनिटांनी कुंभ राशीत प्रवेश करेल. सूर्याच्या या राशी परिवर्तनाने काही राशींच्या व्यक्तींवर शुभ परिणाम पाहायला मिळतील.
सूर्याचे राशी परिवर्तन देणार आनंदी आनंद
तूळ
सूर्याचा कुंभ राशीतील प्रवेश तूळ राशीच्या व्यक्तींसाठीही अत्यंत सकारात्मक फळ देणारा ठरेल. भौतिक सुख प्राप्त होईल. नात्यात गोडवा निर्माण होईल. आकस्मिक धनलाभ होण्याची शक्यता आहे. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कुटुंबीयांचे संबंध चांगले होतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे.
मेष
मेष राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचे हे राशी परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. . आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वडिलांबरोबरचे नाते चांगले होईल. समाजात मान-सन्मान वाढेल. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळेल. या काळात तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. दूरचे प्रवासही घडतील.
वृषभ
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचा कुंभ राशीतील प्रवेश खूप अनुकूल सिद्ध होईल. व्यवसायात प्रगती होईल. नोकरीत प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. या काळात तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)