ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा अधिपती सूर्य १७ जुलै रोजी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी मिथुन राशीचा प्रवास संपवेल आणि कर्क राशीत प्रवेश करेल. १७ ऑगस्ट रोजी दुपारी ०१.३२ मिनिटांनी सूर्य कर्क राशीत प्रवेश करेल. त्याच्या राशी बदलाचा थेट परिणाम विविध राशींच्या लोकांवर होतो. म्हणूनच, इतर राशींसाठी त्याचे संक्रमण कसे असेल हे जाणून घेऊ या.
मेष
कर्क राशीमध्ये सूर्याच्या प्रवेशामुळे मेष राशींच्या लोकांना अनेक अनपेक्षित परिणाम आणि चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. यश मिळाले तरी त्यांना मानसिक अस्वस्थतेचा सामाना करावा लागू शकतो. मित्र आणि नातेवाईकांकडून अप्रिय बातम्या मिळण्याची शक्यता वतर्वली जात आहे. जमीन मालमत्तेशी संबंधित प्रकरणे मार्गी लागण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – बुध ग्रहाच्या उदयामुळे ‘या’ ३ राशींवर होईल गणपतीची कृपा! तुमची रास आहे का यात? जाणून घ्या
वृषभ
कर्क राशीमध्ये सूर्याच्या प्रवेशामुळे वृषभ राशीच्या लोकांना मोठे यश मिळू शकते. विचार करून ठरवलेल्या गोष्टी मार्गी लागतील. या राशीचे लोक एकदा जे ठरवतात ते पूर्ण करूनच दाखवतात. तुम्हाला एखादा मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा नवीन करार करायचा असेल, तर हा बदल त्या दृष्टिकोनातून अनुकूल असेल. भावांसोबत मतभेद होऊ देऊ नका. धर्म आणि आध्यात्मात रुची राहील.
मिथुन
कर्क राशीमध्ये सूर्याच्या प्रवेशामुळे मिथुन राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. अनेक दिवसांपासून दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. काही महागड्या वस्तू खरेदी कराल, ज्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतील. कुटुंबात वादविवादाची परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका. कोणतेही काम पूर्ण होईपर्यंत सर्वांना सांगू नका.
कर्क
कर्क राशीमध्ये सूर्याच्या प्रवेशामुळे या राशीच्या लोकांना अनेक लाभ होऊ शकतात. त्यांनी घेतलेल्या निर्णयांचेही कौतुक होईल. मारामारी, वाद, कोर्ट-कचेरीशी संबंधित प्रकरणेही तुमच्या बाजूने लागण्याची चिन्हे आहेत. विवाहाशी संबंधित बाबींमध्ये आणखी थोडा वेळ लागू शकतो. मुलांची जबाबदारी पूर्ण होईल. नवीन जोडप्यासाठी संतान प्राप्तीचा योग आहे.
सिंह
कर्क राशीमध्ये सूर्याचा प्रवेश सिंह राशीच्या लोकांना चांगले परिणाम देणार नाही, विशेषत: कौटुंबिक कलह आणि मानसिक आजारांना अधिकाधिक सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. हिंडण्या-फिरण्यावर खूप पैसा खर्च होईल. परदेशी मित्र आणि नातेवाईकांकडून अप्रिय बातम्या येतील. खटले आणि न्यायालयाशी संबंधित निर्णय तुमच्या बाजूने येण्याची चिन्हे आहेत. जास्त कर्जाची देवाण- घेवाण टाळा.
कन्या
कर्क राशीमध्ये सूर्याचा प्रवेश कन्या राशीच्या लोकांना चांगले यश मिळवून देईल. त्याचे हे मार्गक्रमण विद्यार्थी आणि स्पर्धेत उतरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. विचारपूर्वक आखलेली धोरणे प्रभावी ठरतील. अभ्यासासाठी परदेशात जाण्याचा प्रयत्न करायचा असला तरी संधी अनुकूल राहील. प्रेमाच्या बाबतीत उदासीनता राहील. त्यामुळे आपल्या कामाकडे लक्ष द्या. मुलांशी संबंधित चिंता दूर होतील, अपत्यप्राप्तीची शक्यता आहे.
हेही वाचा – Chanakya Niti : तुमच्या ‘या’ वाईट सवयींमुळे घरात टिकत नाही लक्ष्मी; जाणून घ्या काय सांगतात आचार्य चाणक्य
तूळ
कर्क राशीमध्ये सूर्यदेवाने प्रवेश केल्याने तूळ राशीच्या लोकांना यश मिळेल. केंद्र किंवा राज्य सरकारच्या विभागांमध्ये प्रतीक्षेत असलेली कामे पूर्ण होतील. तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या सरकारी टेंडरसाठी अर्ज करायचा असेल किंवा नोकरी बदलण्यासाठी अर्ज करायचा असेल, तर त्या दृष्टीनेही ग्रहांचे मार्गक्रमण अनुकूल राहील. पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या.
वृश्चिक
कर्क राशीमध्ये सूर्याच्या प्रवेशाने वृश्चिक राशीच्या लोकांवर त्याचा संमिश्र प्रभाव राहील. व्यवसायात थोडेसे यश मिळू शकेल, पण ते फार काळ टिकणार नाही. आध्यात्मिक विकास होईल. हे लोक सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी होऊ शकतात आणि दान-पुण्य करू शकतात. कुटुंबातील लहान भावांचे सहकार्य मिळेल. जर तुम्हाला परदेशी कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज करायचा असेल किंवा इतर कोणत्याही देशासाठी व्हिसासाठी अर्ज करायचा असेल, तर त्या दृष्टीनेही ग्रहांचे मार्गक्रमण अनुकूल राहील.
धनु
कर्क राशीमध्ये सूर्याच्या प्रवेशाचा धनु राशीच्या लोकांवर संमिश्र प्रभाव राहील. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून वेळ सामान्य असेल, परंतु काही सरकारी घोषणा तुमच्या बाजूने असू शकतात. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वाद मिटतील. आरोग्यबाबत काळजी घ्या. प्रत्येक काम आणि निर्णय विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक करा.
मकर
कर्क राशीमध्ये सूर्याचा प्रवेश झाल्याने मकर राशीच्या लोकांवर त्याचा प्रभाव फारसा चांगला आहे असे म्हणता येणार नाही, परंतु व्यवसायाच्या दृष्टिकोनातून काम चांगले होईल. वैवाहिक जीवनाशी संबंधित बाबींमध्ये थोडा अधिक विलंब होईल. वैवाहिक जीवनात कटूता येऊ देऊ नका. प्रेमाच्या बाबतीतही उदासीनता राहील, त्यामुळे कामाकडे अधिक लक्ष द्या. सासरच्या मंडळींबरोबर तुमचे नाते बिघडू देऊ नका.
कुंभ
कर्क राशीमध्ये सूर्याचा प्रवेश कुंभ राशीच्या लोकांवर होणारा परिणाम वरदानापेक्षा कमी नाही. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील. शत्रूंचा पराभव होईल. न्यायालयीन प्रकरणांमध्येही तुमच्या बाजूने निर्णय येण्याचे संकेत आहेत. परदेशी प्रवासात फायदा होईल. परदेशी कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज करणेदेखील यशस्वी होईल. सरकारी सेवेसाठी अर्ज करणेदेखील या काळात यशस्वी होईल.
मीन
कर्क राशीमध्ये सूर्याचा प्रवेश मीन राशीच्या लोकांवर होणारा प्रभाव खूप संमिश्र राहील. हा बदल विद्यार्थी आणि स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वरदानासारखा आहे. रिसर्चमध्ये मोठे यश मिळेल. प्रेमप्रकरणात निराशा येईल, त्यामुळे करिअरवर लक्ष केंद्रित करणे चांगले असेल. मुलांची जबाबदारी पार पडेल. नवविवाहित जोडप्यासाठी अपत्यप्राप्तीची शक्यता आहे. सर्जनशील कार्याच्या इतर बाबतीत यश मिळेल.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित असून लोकसत्ता याची पुष्टी करत नाही)