ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रह नियमित अंतराने राशी परिवर्तन करत असतात. तसेच नवग्रह २७ नक्षत्रांमधूनही गोचर करत असतात. नवग्रहांचे राशीपरिवर्तन जितके महत्त्वाचे मानले जाते, तेवढेच नक्षत्र गोचरालाही महत्त्व असते, असे सांगितले जाते. नवग्रहांकडे राशीप्रमाणे नक्षत्रांचेही स्वामित्व असते. आता सूर्यदेव १५ जानेवारीला मकर राशात प्रवेश करणार आहेत. त्यापूर्वी ग्रहांचा राजा सूर्यदेव नक्षत्र बदल करणार आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रहांचं नक्षत्र बदलणे अतिशय शुभ मानले जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

येत्या ११ जानेवारीला सूर्यदेव उत्तरषाढा नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. तर दुसरीकडे शनिदेव कुंभ राशीत विराजमान आहेत. शनि ११ जानेवारीला शतभिषा नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात प्रवेश करणार आहेत. २७ नक्षत्रांपैकी शतभिषा नक्षत्र २४ वे आहे. या दोन्ही ग्रहांच्या नक्षत्र परिवर्तनाने काही लोकांच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि अपार धन लाभण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना शनि आणि सुर्यदेवाच्या नक्षत्र गोचरमुळे फायदा होण्याची शक्यता आहे.

(हे ही वाचा : पुढील ४ महिन्यानंतर ‘या’ राशी होणार कोट्यधीशांच्या मालक? १२ वर्षांनी देवगुरु गोचर करताच होऊ शकतो धनलाभ )

‘या’ राशींना मिळणार सुख?

मेष राशी

शनि शतभिषा नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात प्रवेश करुन या राशीच्या अकराव्या भावात राहणार आहेत. तर सूर्यदेव नवव्या भावात असतील. अशा स्थितीत मेष राशीच्या लोकांची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते. नवीन नोकरीच्या शोधात असलेले लोकही यश मिळवू शकतात. नोकरीच्या ठिकाणी अफाट यशासह बढती मिळू शकते. व्यवसायिकांना चांगला नफा मिळू शकतो. स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकते. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे.

सिंह राशी

या राशीच्या लोकांना सूर्य आणि शनिदेवाच्या नक्षत्र परिवर्तनामुळे मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. सिंह राशीच्या लोकांना या काळात परदेशात जाण्याची संधी मिळू शकते किंवा लांबच्या प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर यावेळी तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळू शकतात. यावेळी तुम्हाला खूप आर्थिक फायदा होऊ शकतो. बँक बॅलन्समध्ये वाढ होऊ शकते. प्रेम आणि वैवाहिक जीवन चांगले राहण्याची शक्यता आहे.

(हे ही वाचा : Vastu Tips Calendar: घरात ‘या’ दिशेला कॅलेंडर लावल्याने नांदते सुख-समृद्धी? शास्त्रात काय सांगितलंय पहा जरा )

तूळ राशी

सूर्य आणि शनिदेवाच्या कृपेने तूळ राशीच्या लोकांना अतिशय शुभ परिणाम पाहायला मिळू शकतात. प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी पद आणि प्रतिष्ठा मिळण्यासोबतच धनलाभही होण्याची शक्यता आहे. आर्थिक उत्पन्नाचे नवे मार्ग सापडू शकतात. आई-वडिलांचा व घरातील वडीलधाऱ्यांचा भक्कम पाठिंबा मिळू शकतो. या काळात आरोग्य ठणठणीत राहण्याची शक्यता आहे. या राशीचे लोकं शनिदेवाच्या कृपेने करिअरमध्ये नवीन उंची गाठू शकतात. 

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sun transit in uttarashada nakshatra shani in shatbhisha nakshatra these zodiac signs can get huge money pdb