Surya Nakshatra Gochar 2024: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्य हा महत्त्वाच्या ग्रहांपैकी एक मानला जातो. सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो, ज्यामुळे प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रभाव पडतो. यावेळी सूर्य स्वत:च्या राशीमध्ये स्थित आहे. सूर्य स्वत:च्या राशीत असल्यामुळे अनेक पट जास्त परिणाम देईल. सूर्याबरोबरच नक्षत्रही वेळोवेळी बदलत असते. सूर्याच्या राशीतील बदलाचा प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होतो. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी म्हणजेच ३० ऑगस्ट रोजी सूर्याचे नक्षत्र बदलेल आणि शुक्राचे नक्षत्र पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश केला आहे. अशा परिस्थितीत काही राशीच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडू शकतो. चला जाणून घेऊया सूर्य पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश केल्याने कोणत्या राशींना सर्वाधिक फायदा होईल.
द्रिक पंचांग नुसार, ३० ऑगस्ट रोजी दुपारी ३:५५ वाजता सूर्य पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश केला आहे आणि १३ सप्टेंबरपर्यंत या नक्षत्रात राहील. पूर्वा फाल्गुनी नक्षत्र हे २७ नक्षत्रांपैकी १३वे नक्षत्र असून या नक्षत्राचा स्वामी शुक्र आहे आणि सिंह राशीचा स्वामी आहे. यावेळी सूर्य सिंह राशीत आहे. अशा स्थितीत सूर्य अधिक शक्तिशाली होईल. यासह सूर्य आपल्या मित्र शुक्राच्या नक्षत्रात येऊन शुक्राचा परिणाम देईल.
मिथुन राशी
या राशीमध्ये सूर्य तिसर्या भावात स्थित आहे. सूर्य पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात असल्यामुळे या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतात. जे लोक परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांना लाभ मिळू शकतो. तुम्हाला चांगल्या पगारासह प्रमोशन मिळू शकते. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. व्यवसायात तुमच्या प्रयत्नांना यश मिळू शकते. तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचा वेळ चांगला जाईल. याबरोबर तुम्ही सहलीला जाण्याचाही प्लॅन करू शकता.
हेही वाचा – Pitru Paksha 2024 Date: २०२४ मध्ये कधी सुरू होईल पितृपक्ष? तिथीनुसार जाणून घ्या, १६ श्राद्धांच्या तारखा
धनु राशी
पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात सूर्याचा प्रवेश धनु राशीच्या लोकांसाठी भाग्यवान ठरू शकतो. या राशीच्या लोकांना भौतिक सुख मिळेल. यासह परदेशातूनही चांगली कमाई होऊ शकते. याबरोबर पैसे कमावण्याच्या अनेक संधी मिळू शकतात. नोकरदार लोकांना हा काळ कामाच्या बाबतीत भाग्यवान सिद्ध होऊ शकता. या द्वारे तुमचे परदेशात काम करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. व्यावसायिकांना त्यांच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. अशा परिस्थितीत तुम्हाला भरपूर नफा मिळेल आणि तुमचा व्यवसायही वेगाने प्रगती करेल. तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचा वेळ चांगला जाईल. अविवाहित लोकांनाही लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. आर्थिक स्थिती मजबूत राहील.
कुंभ राशी
पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात सूर्याचे संक्रमण कुंभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या राशीच्या लोकांचा मित्रांबरोबर चांगला वेळ जाईल. तुम्हाला कामाच्या संदर्भात खूप प्रवास करावा लागू शकतो. पण भविष्यात तुम्हाला याचा भरपूर फायदा होऊ शकतो. परदेशात काम करण्याची इच्छा असल्यास, संधी मिळू शकते. तुम्हाला नशीबाची पूर्ण साथ मिळेल, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकाल. नवीन व्यवसायातही तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो तुमचे संबंध चांगले राहतील. आरोग्यही चांगले राहील.