एप्रिल महिन्यात ९ ग्रह आपली राशी बदलणार आहेत, तर या महिन्यात आणखी एक घटना घडणार आहे. ३० एप्रिल रोजी सूर्यग्रहण होणार आहे. २०२२ या वर्षातील हे पहिले ग्रहण असेल. ग्रहणापूर्वी सर्व ग्रहांनी आपली राशी बदलली असेल. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून, ग्रहांचे बदल आणि ग्रहण या खगोलीय घटना खूप महत्त्वाच्या आहेत. ३० एप्रिल रोजी ग्रहणाशी संबंधित सर्व महत्वाची माहिती जाणून घ्या.
सूर्यग्रहण -३० एप्रिल २०२२
वर्षातील पहिले सूर्यग्रहण ३० एप्रिल २०२२ रोजी होणार आहे. हे आंशिक सूर्यग्रहण असेल जे मेष आणि भरणी नक्षत्रात होईल. भारतीय वेळेनुसार, ग्रहण ३० एप्रिलच्या मध्यरात्री १२ वाजून १५ मिनिटांना सुरु होईल आणि १ मे रोजी पहाटे ४ वाजून ७ मिनिटांना समाप्त होईल. हा ग्रह प्रशांत महासागर, अटलांटिक, अंटार्क्टिका आणि दक्षिण अमेरिकेत दिसणार आहे. हे ग्रहण भारतात होत नाही. त्यामुळे त्याचा सुतक काळही वैध ठरणार नाही.
या ४ राशींना सूर्यग्रहणाचा फायदा होईल
वृषभ (Taurus) : या राशीच्या लोकांवर ग्रहणाचा शुभ प्रभाव राहील. प्रलंबित कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. आर्थिक लाभाच्या अनेक संधी मिळतील. वडिलोपार्जित संपत्तीतूनही तुम्हाला चांगले लाभ मिळू शकतील. उत्पन्नात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा : “मी पुन्हा शेंगा विकेन पण…”, कच्चा बादाम फेम गायकाला होतोय पश्चाताप
कर्क (Cancer) : या राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण वरदानापेक्षा कमी नसेल. तुम्हाला अनेक प्रकल्पांमध्ये यश मिळेल. तुमची प्रतिष्ठा वाढेल. तुम्ही प्रवासातून भरपूर पैसेही कमवू शकाल. व्यावसायिकांनाही नफा मिळविण्याच्या अनेक संधी मिळतील.
आणखी वाचा : आराध्याने साकरली सीतेची भूमिका, राम नवमीच्या आधी फोटो झाले व्हायरल
तूळ (Libra) : या ग्रहणामुळे तुमचे भाग्य वाढेल. नोकरीत लाभ मिळण्याच्या अनेक संधी मिळतील. व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकेल. गुंतवणुकीतूनही चांगली रक्कम मिळू शकते. परदेशात जाण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते.
आणखी वाचा : दीपिकानेच शेअर केला आलिशान बेडरूमचा फोटो, पाहिलात का?
धनु (Sagittarius) : या राशीच्या लोकांसाठी काळ अतिशय अनुकूल आहे. सरकारी कामात चांगले यश मिळेल. प्रत्येक गोष्टीत नशीब तुमची साथ देईल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ उत्तम आहे.