Surya Nakshatra Gochar 2024: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या विशिष्ट वेळी गोचर करतो आणि सर्व राशींच्या जीवनावर परिणाम करतो. ज्योतिषशास्त्रात सूर्य हा ग्रहांचा राजा मानला जातो. सूर्यदेव सुमारे एक महिन्यानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत बदलतात. त्यामुळे सूर्यदेवाचे संक्रमण विशेष मानले जाते. सूर्य राशीच्या बदलाबरोबरच नक्षत्रही बदलतो. नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य नक्षत्र गोचर करत आहे. १३ सप्टेंबर रोजी सूर्य सकाळी ९ वाजून ४४ मिनिटांनी उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करेल. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र हे २७ नक्षत्रांपैकी बारावे नक्षत्र आहे आणि या नक्षत्राचा स्वामी सूर्यच आहे. यासोबतच सूर्य सिंह राशीत स्थित आहे. स्वतःच्या राशी आणि नक्षत्रात असल्यामुळे सूर्य अनेक पटींनी अधिक शक्तिशाली होईल. त्यामुळे सूर्यदेवाच्या कृपेने काही राशींचे भाग्य उजळण्याची शक्यता आहे. कोणत्या राशींना फायदा होईल, जाणून घेऊया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘या’ राशींचे सुखाचे दिवस?

वृषभ राशी (Taurus Zodiac)

सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनामुळे वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ शकतात. नवीन कामातून प्रगती आणि यश तुम्हाला लाभण्याची शक्यता आहे. तुम्हाला आर्थिक फायदा या काळात होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी देखील हा काळ यशाचा असू शकतो.  व्यावसायिकांसाठी हा काळ मोठा नफा घेऊन येणारा ठरु शकतो. अनेक मार्गांनी या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता आहे. ज्या कामात हात घालात त्यात यशस्वी होऊ शकता. या कालावधीत, व्यक्तीला नशिबाची पूर्ण साथ मिळून बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळू शकतात.

(हे ही वाचा : सप्टेंबर सुरु होताच ‘या’ राशींच्या व्यक्तींना लक्ष्मी बनवणार श्रीमंत? ३ मोठे ग्रह करणार राशीमध्ये बदल, कुणाला होणार फायदा?)

सिंह राशी (Leo Zodiac)

सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनामुळे हा काळ सिंह राशीच्या लोकांसाठी सोनेरी दिवस घेऊन येणारा ठरु शकतो. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. नवीन आर्थिक स्रोत या कालावधीत तयार होऊ शकतात. अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे या काळात पूर्ण होऊ शकतात. आर्थिक स्थिती या कालावधीत भक्कम होऊ शकते. तुमचं परदेशात जाण्याचं स्वप्नदेखील पूर्ण होण्याची शक्यता आहे. समाजात मानसन्मान वाढू शकतो.

तूळ राशी (Libra Zodiac)

सूर्यदेवाच्या कृपेने तूळ राशीच्या लोकांना अनपेक्षित पैसे मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडून आर्थिक लाभ होण्याची देखील दाट शक्यता आहे. कामात यश मिळू शकते. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांनाही या काळात यश मिळू शकते. करिअरमध्येही फायदा होऊ शकतो. अडकलेले व प्रलंबित पैसे मिळण्याची देखील शक्यता आहे. या कालावधीत वाहन किंवा मालमत्ता खरेदीचा योग जुळून येऊ शकतो. प्रवासाची शक्यता आहे. या प्रवासातून तुम्हाला फायदा देखील होऊ शकतो. तसेच धार्मिक कार्यात रुची वाढण्याची शक्यता आहे. 

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)