Surya Gochar 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्याला आत्मा, पिता आणि पद-प्रतिष्ठेचा कारक ग्रह मानले जाते. सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. अनेकदा सूर्याच्या राशी परिवर्तनाच्या प्रभावाने काही शुभ ग्रहांसह युतीदेखील निर्माण करतो. १४ मार्च रोजी सूर्याने मीन राशीत प्रवेश केला असून या राशीत आधीपासून बुध आणि शुक्र ग्रह विराजमान आहेत. सूर्य आणि बुधाच्या युतीमुळे बुधादित्य आणि सूर्य आणि शुक्राच्या युतीमुळे शुक्रादित्य राजयोग निर्माण होईल. हे दोन्ही राजयोग एकाच वेळा निर्माण झाल्याने त्याचा शुभ प्रभाव काही राशींवर झालेला पाहिलेला मिळेल.

बुधादित्य आणि शुक्रादित्य राजयोग करणार मालामाल

वृषभ

वृषभ राशीसाठी बुधादित्य आणि शुक्रादित्य राजयोग फायदेशीर ठरेल. या काळात आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तसेच यावेळी तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल आणि आरोग्यही सुधारेल. तसेच, या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. त्याच वेळी, तुम्हाला तुमच्या जोडीदाराची साथ मिळेल. या काळात अविवाहित लोकांसाठी चांगले संबंध येऊ शकतात. तसेच, यावेळी तुम्हाला भागीदारीच्या कामात चांगला नफा मिळेल.

तूळ

तूळ राशीसाठी बुधादित्य आणि शुक्रादित्य राजयोग खूप अनुकूल ठरेल. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. त्याचसह उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुम्ही जमीन आणि वाहन खरेदीच्या दिशेने वाटचाल कराल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळेल. निर्यात आणि आयात व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. या काळात मुलांकडून आनंदी वार्ता येतील.

धनु

मीन राशीत निर्माण झालेला बुधादित्य आणि शुक्रादित्य राजयोगा धनु राशीसाठी शुभ सिद्ध होईल. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रचंड यश मिळेल आणि उत्पन्नात प्रvचंड वाढ होईल. तसेच, बेरोजगार लोकांना यावेळी नवीन नोकरी मिळू शकते. त्याचबरोबर नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. तसेच, यावेळी, तुमच्या वडिलांबरोबरच्या नातेसंबंधात सुधारणा होईल. तुमचा मान-सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)