30th January Horoscope Marathi: ३० जानेवारी, मंगळवार, श्री गणेशाचा दिवस. या दिवशी काही राशींच्या खर्चात वाढ होऊ शकते. तर अनेकांच्या कलागुणांना वाव मिळेल. कसा जाणार आहे सर्व राशींना आजचा दिवस पाहा.

मेष:-सर्वांशी मिळून-मिसळून वागाल. उत्तम व्यक्तिमत्व जपाल. नवीन गोष्टीत रस घ्याल. आपला छंद उत्तमरीत्या जपाल. वैवाहिक सौख्य वाढीस लागेल.

3rd February 2025 Rashi Bhavishya In Marathi
३ फेब्रुवारी राशिभविष्य: व्यापारात होईल फायदा, मैत्रीची लाभेल साथ; वाचा १२ राशींच्या आठवड्याची कशी होणार सुरुवात?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
basant panchami 2025 shani gochar saturn transit in purvabhadra nakshatra second stage positive effect on these zodiac sign
वसंत पंचमीला न्यायदेवता शनी करणार नक्षत्र परिवर्तन! या ३ राशींचे नशीब चमकणार, कर्मफळ दाता करणार प्रत्येक इच्छा पूर्ण
Sagittarius Horoscope
Sagittarius Horoscope Today : गणेश जयंतीचा शुभ दिवस धनु राशीला करणार मालामाल; पैसा, प्रेम सर्वकाही मिळणार, जाणून घ्या कसा जाईल संपूर्ण दिवस
sagittarius horoscope today 30 january 2025
आज धनु राशीच्या लोकांची प्रवासाची हौस होऊ शकते पूर्ण? जाणून घ्या कसा जाईल आजचा दिवस
Virgo Horoscope Today
Virgo Horoscope Today : मौनी अमावस्येचा दिवस कन्या राशीला देणार पैसा, प्रेम अन् सुखाचे क्षण; जाणून घ्या कन्या राशीला कसा जाईल संपूर्ण दिवस
Numerology Valentine Day 2025
Numerology Valentine Day 2025 : व्हॅलेंटाईन डेच्या आधी ‘या’ जन्मतारखेच्या लोकांवर होईल प्रेमाचा वर्षाव, जोडीदाराबरोबरचे मतभेद, वाद होतील दूर
Libra Horoscope Today
Libra Horoscope Today : आजच्या दिवशी सावधगिरी बाळगा अन् खर्चावर नियंत्रण ठेवा; जाणून घ्या तूळ राशीला कसा जाईल संपूर्ण दिवस

वृषभ:-मनातील विचित्र कल्पना काढून टाकाव्यात. काहीशी गुप्तता बाळगाल. आवडीच्या गोष्टी करण्यावर भर द्याल. स्त्रीवर्गापासून सावध राहावे. उत्तम व्यावसायिक लाभ होईल.

मिथुन:-मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल. नवीन वाहन घेण्याचा विचार कराल. तुमची समाजप्रियता वाढीस लागेल. मित्रांचा गोतावळा जमवाल. उच्च रहाणीमानाची आवड दर्शवाल.

हेही वाचा : फेब्रुवारीमध्ये ‘या’ ३ राशींचे भाग्य चमकू शकते; ‘लक्ष्मी-नारायण राजयोगा’च्या निर्मितीमुळे मिळू शकतो अपार पैसा

कर्क:-दिवस आळसात घालवाल. औद्योगिक वातावरण चांगले राहील. सौंदर्य प्रसाधने खरेदी कराल. अंगीभूत कलागुण वाढीस लागतील. चैनीकडे कल राहील.

सिंह:-कलेला पोषक वातावरण लाभेल. आवडीचे साहित्य वाचायला मिळेल. लेखकांना कलागुण विकसित करता येतील. घरात टापटीप ठेवाल. कामाची योग्य पोचपावती मिळेल.

कन्या:-सांपत्तिक दर्जा सुधारण्याचा प्रयत्न कराल. सासुरवाडीची मदत मिळेल. बौद्धिक कामात गतीमानता येईल. धार्मिक कामात हातभार लावाल. कामाचा दर्जा सुधाराल.

तूळ:-अचानक धनलाभ संभवतो. पत्नीचे लाडिक हट्ट पुरवाल. महिलांना उत्तम गृहिणीपदाचा मान मिळेल. एकमेकातील समजूतदारपणा वाढेल. कलेच्या क्षेत्रात प्रगती करता येईल.

वृश्चिक:-भागिदारीतून चांगली कमाई होईल. इतरांच्या विश्वासावर खरे उतरावे. योग्य संधीची वाट पहावी. नातेवाईकांकडून मदत मिळेल. हाताखालील लोकांकडून सहकार्य मिळेल.

धनू:-कलात्मक दृष्टीकोन ठेवाल. डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. करमणुकीचे कार्यक्रम पाहाल. आत्मिक समाधान मिळेल. सारासार विचार करून निर्णय घ्यावा.

मकर:-आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी. उत्तम वाहन सौख्य लाभेल. घरगुती गोष्टींमध्ये रमून जाल. क्षुल्लक गोष्टींमधील कटुता टाळण्याचा प्रयत्न कराल. सर्वांशी प्रेमाने वागाल.

कुंभ:-हस्तकलेसाठी वेळ काढा. प्रवासाची हौस भागवाल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवा. सौंदर्यवादी दृष्टीकोन बाळगावा.

मीन:-मोठ्या लोकांच्या ओळखीने कामे होतील. आर्थिक स्थैर्य जपण्याचा प्रयत्न कराल. गायन कलेचे कौतुक केले जाईल. मूल्यवान वस्तू खरेदी केल्या जातील. कामातील बदल लक्षात घ्यावेत.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader