14th January Horoscope Marathi: आज १४ जानेवारी, रविवार काहींसाठी लाभदायक ठरणार आहे. या राशींना कुटुंबाचा उत्तम सहवास लाभेल. मात्र, काहींनी आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. आज तुमच्या कुंडिलीचे ग्रहमान कसे असेल पाहा.

मेष:- बुद्धीला पटेल तोच निर्णय घ्या. संमिश्र घटनांचा दिवस. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. ओळखीच्या लोकांकडून फायदा होईल. दिवस चांगला जाईल.

mahakumbh 2025
आज महाकुंभमेळ्यातील शेवटचे अमृत स्नान! बुधादित्य योगामुळे ‘या’ ३ राशींचा होईल भाग्योदय, करिअर -व्यवसायात मिळेल भरपूर यश
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Surya Transit In shanis Kumbh rashi
१३ फेब्रुवारीपासून चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब; सूर्याच्या कृपेने घरी येईल लक्ष्मी, मिळणार बक्कळ पैसा!
2nd February 2025 Rashi Bhavishya
२ फेब्रुवारी पंचांग: सरस्वतीच्या कृपेने कोणाच्या घरात येईल यश आणि प्रसिद्धी? रविवारी तुमच्या राशीची होणार का इच्छापूर्ती?
basant panchami 2025 shani gochar saturn transit in purvabhadra nakshatra second stage positive effect on these zodiac sign
वसंत पंचमीला न्यायदेवता शनी करणार नक्षत्र परिवर्तन! या ३ राशींचे नशीब चमकणार, कर्मफळ दाता करणार प्रत्येक इच्छा पूर्ण
Gupt Navratri 2025
Gupt Navratri 2025: माघ महिन्यातील नवरात्रीला गुप्त नवरात्र का म्हटलं जातं? या काळात देवीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करा ‘या’ प्रभावी स्तोत्रांचे पठण
Shani Gochar 2025
फेब्रुवारी महिन्यात शनि देव बदलणार चाल, ‘या’ तीन राशींचे धनी होणार! मिळणार धन-संपत्ती आणि ऐश्वर्य
seven Navpancham Yog
तब्बल ५५९ वर्षानंतर निर्माण होतोय सात नवपंचम राजयोग, ‘या’ तीन राशींची होईल चांदीच चांदी! धन लाभ अन् भाग्योदय होण्याचा प्रबळ योग

वृषभ:- आरोग्यात सुधारणा संभवते. मुलांच्या उत्कर्षाचा काळ. व्यापार्‍यांनी अधिक मेहनत घ्यावी. सरकारी कर्मचार्‍यांचे मतभेद होऊ शकतात. उगाचच वादात अडकू नका.

मिथुन:- नवीन संधी दार ठोठावेल. उगाच स्वत:ला एखाद्या वादात अडकवू नका. लाभदायक दिवस. शेअर बाजारातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. जुगारातून लाभ संभवतो.

हेही वाचा : Vastu Tips: घराच्या ‘या’ दिशेला मेणबत्ती लावल्याने सुख-समृद्धी नांदते दारी? शास्त्रात काय सांगितलंय पहा जरा

कर्क:- अधिकाराचा अति वापर टाळावा. दिवसभर कामात गर्क राहाल. कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. आत्ममग्न राहाल. वैचारिक दिशा बदलून पहावी.

सिंह:- कौटुंबिक सौख्याचा समतोल राखावा. कलाक्षेत्राबाबत अपेक्षित वार्ता मिळतील. हित शत्रू त्रास देण्याचा प्रयत्न करतील. मनातील अनामिक भीती काढून टाकावी. अनोळखी व्यक्तींशी व्यवहार टाळावेत.

कन्या:- कोणतीही गुंतवणूक सावधगिरीनेच करावी. आवक आणि जावक यांचा मेळ घालावा. वाहन चालवताना काळजी घ्यावी. रागावर नियंत्रण ठेवा. समोरील गोष्टीत आनंद शोधावा.

तूळ:- इतरांना सल्ले द्यायला जाल. कामाची दिवसभर धांदल राहील. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक केले जाईल. एखादी घटना मन विचलीत करू शकते. इच्छा नसताना सुद्धा प्रवास करावा लागू शकतो.

वृश्चिक:- लोकांवर अवलंबून राहू नका. पुढे ढकललेले काम हाती घ्या. मानसिक संतुलन राखावे. मनातील निराशाजनक विचार काढून टाकावेत. उगाचच लपवाछपवी करायला जाऊ नये.

धनू:- दूरदृष्टी ठेवून विचार करावा. योग्य नियोजनावर भर द्यावा. शक्यतो आपल्या मुद्यावर ठाम रहा. कुटुंबातील सदस्यांची साथ लाभेल. व्यवहारात निष्काळजीपणा करू नका.

हेही वाचा : ६२ दिवसांनी ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत? मंगळदेवाचं गोचर होताच लक्ष्मी कृपेने मिळू शकतो अपार पैसा

मकर:- जोडीदाराच्या साथीने मनोकामना पूर्ण करा. व्यवसायात अति विश्वास ठेऊ नका. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. कामातील उत्साह वाढीस लागेल. दिवस धावपळीत जाईल.

कुंभ:- फसवणुकीपासून सावध राहावे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. वडीलधार्‍यांचा योग्य तो मान राखावा. आवडीच्या वस्तु खरेदी कराल. मानसिक शांतता जपावी.

मीन:- कामात मित्रांचा सल्ला घ्याल. अति मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. वैचारिक समतोल साधावा. उत्साहाने कामे हाती घ्यावीत. भडक विचार मांडू नका.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader