17th march Horoscope Marathi: १७ मार्च, दुर्गाष्टमी : रविवार पंचांग, आज काही राशींचा दिवस प्रसन्न आणि मनासारखा जाईल. कोणत्या राशींना होऊ शकतो धनलाभ पाहा. जाणून घ्या तुमच्या कुंडलीचे आजचे ग्रहमान.

मेष:- तुमच्या प्रसन्न व्यक्तिमत्वाची छाप पडेल. सर्वजण तुमच्याकडे आकर्षिले जातील. आल्या-गेल्याचे तुम्ही उत्तम आदरातिथ्य कराल. दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.

3rd February 2025 Rashi Bhavishya In Marathi
३ फेब्रुवारी राशिभविष्य: व्यापारात होईल फायदा, मैत्रीची लाभेल साथ; वाचा १२ राशींच्या आठवड्याची कशी होणार सुरुवात?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Surya Transit In shanis Kumbh rashi
१३ फेब्रुवारीपासून चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब; सूर्याच्या कृपेने घरी येईल लक्ष्मी, मिळणार बक्कळ पैसा!
2nd February 2025 Rashi Bhavishya
२ फेब्रुवारी पंचांग: सरस्वतीच्या कृपेने कोणाच्या घरात येईल यश आणि प्रसिद्धी? रविवारी तुमच्या राशीची होणार का इच्छापूर्ती?
Shani Gochar 2025
फेब्रुवारी महिन्यात शनि देव बदलणार चाल, ‘या’ तीन राशींचे धनी होणार! मिळणार धन-संपत्ती आणि ऐश्वर्य
sagittarius horoscope today 30 january 2025
आज धनु राशीच्या लोकांची प्रवासाची हौस होऊ शकते पूर्ण? जाणून घ्या कसा जाईल आजचा दिवस
february 2025 grah gochar budh surya mangal gochar
फेब्रुवारीमध्ये ‘या’ ४ राशींची होईल चांदीच चांदी! अचानक धन लाभ अन् भाग्योदय होण्याचा प्रबळ योग
Guru Margi 2025 Jupiter Margi in Taurus
Guru Margi 2025 : वसंत पंचमीनंतर चमकणार ‘या’ तीन राशींच्या लोकांचे भाग्य; गुरूच्या आशीर्वादाने होऊ शकता प्रचंड श्रीमंत

वृषभ:- मनाच्या चंचलतेला आवर घालावी. काही बाबींचा पुनर्विचार कराल. प्रवासात आरोग्याची काळजी घ्यावी. कमिशनच्या कामातून लाभ होईल. मोठ्या लोकांचा सहवास लाभेल.

मिथुन:- मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. कामे सुरळीत पार पडतील. तुमच्या मनातील योजना व्यवस्थित आखल्या जातील. जोडीदाराचा विचार जाणून घ्यावा. मौल्यवान वस्तु खरेदी कराल.

कर्क:– तुमच्या केलेचे योग्य मूल्यमापन केले जाईल. प्रशस्तीपत्रकास पात्र व्हाल. वरिष्ठांना खुश ठेवावे लागेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. नातवाईकांची मदत मिळेल.

हेही वाचा : २४ एप्रिलपर्यंत प्रचंड पैसे कमावतील ‘या’ राशी? शुक्र आणि राहूची युती होताच लक्ष्मीकृपेने होऊ शकतो मोठा धनलाभ

सिंह:- आधिभौतिक गोष्टींपासून दूर राहाल. वाचनाची आवड पूर्ण कराल. कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळेल. जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवावा लागेल. वरिष्ठांशी मतभेद संभवतात.

कन्या:- कमी श्रमात कामे होतील. रेस, जुगार यातून धनलाभ संभवतो. वारसाहक्काच्या कामातून फायदा होईल. अपचनाचा त्रास जाणवेल. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे.

तूळ:- उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदाराची उत्कृष्ट साथ मिळेल. एकमेकातील समजूतदारपणा वाढीस लागेल. दिखाऊपणाला भुलून जाऊ नये. बौद्धिक दृष्टीकोन ठेवावा.

वृश्चिक:- केलेल्या कामाचे समाधान मिळेल. लोकोपवादापासून दूर राहावे. चुकीच्या मार्गाचा अवलंब टाळावा. पारदर्शीपणाने कामे करावी लागतील. व्यसनापासून दूर राहावे.

धनू:- प्रवासात काही कारणाने अडचणी संभवतात. अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. काही बदल मनाविरुद्ध करावे लागू शकतात. घाई घाईने कोणालाही शब्द देऊ नका. पारंपरिक कमला गती येईल.

मकर:- उतावीळपणे कोणतेही काम करू नका. कामाची धांदल उडेल. मनाची द्विधावस्था होईल. बौद्धिक चातुर्य दाखवाल. नवीन मित्र जोडावेत.

कुंभ:- सर्वांशी गोडीने बोलाल. बौद्धिक डावपेच खेळाल. गोष्टी अधिक खोलात जाऊन जाणून घ्याल. योग्य तर्काचा वापर कराल. हसत-हसत आपली मते मांडाल.

मीन:- कामाचा उरक वाढवावा लागेल. आवडी-निवडी बाबत अधिक दक्ष राहाल. आवडीचे पदार्थ बनवायला लावाल. काही वेळ स्वत:साठी देखील काढावा. लबाड लोकांपासून दूर रहा.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader