8th January Horoscope Marathi: आज ८ जानेवारी, सोमवार या आठवड्याच्या सुरवातीला कुणाची राहिलेली देणी परत येतील आणि कुणी मतभेद टाळायला हवे याचा आढावा घेऊया.

मेष:-व्यावसायिक स्तरावर एखादी चांगली घटना घडेल. स्वप्नाळू वृत्तीतून बाहेर या. एखादी दिलासादायक घटना घडेल. भाग्याची साथ लाभेल. आर्थिक घडी सुधारेल.

3rd February 2025 Rashi Bhavishya In Marathi
३ फेब्रुवारी राशिभविष्य: व्यापारात होईल फायदा, मैत्रीची लाभेल साथ; वाचा १२ राशींच्या आठवड्याची कशी होणार सुरुवात?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
2nd February 2025 Rashi Bhavishya
२ फेब्रुवारी पंचांग: सरस्वतीच्या कृपेने कोणाच्या घरात येईल यश आणि प्रसिद्धी? रविवारी तुमच्या राशीची होणार का इच्छापूर्ती?
basant panchami 2025 shani gochar saturn transit in purvabhadra nakshatra second stage positive effect on these zodiac sign
वसंत पंचमीला न्यायदेवता शनी करणार नक्षत्र परिवर्तन! या ३ राशींचे नशीब चमकणार, कर्मफळ दाता करणार प्रत्येक इच्छा पूर्ण
Gupt Navratri 2025
Gupt Navratri 2025: माघ महिन्यातील नवरात्रीला गुप्त नवरात्र का म्हटलं जातं? या काळात देवीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी करा ‘या’ प्रभावी स्तोत्रांचे पठण
Numerology Valentine Day 2025
Numerology Valentine Day 2025 : व्हॅलेंटाईन डेच्या आधी ‘या’ जन्मतारखेच्या लोकांवर होईल प्रेमाचा वर्षाव, जोडीदाराबरोबरचे मतभेद, वाद होतील दूर
Weekly Horoscope 27January To 2 Febuary 2025
Weekly Horoscope 27January To 2 February 2025: जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात ‘या’ ६ राशींचे उजळणार भाग्य! मिळणार चांगली बातमी, १२ राशींचे साप्ताहिक राशिभविष्य
26 January 2025 Rashi Bhavishya In Marathi २६ जानेवारी राशिभविष्य आणि पंचांग
26 January Horoscope: ज्येष्ठा नक्षत्रात काही राशींना अचानक होईल धनलाभ! कोणाच्या नशिबात नवीन संधी तर कोणाला मिळेल गुंतवणुकीत लाभ, वाचा रविवारचे राशिभविष्य

वृषभ:-तब्येतीला जपा. छोट्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. उपयोगी वस्तूंची खरेदी केली जाईल. मानसिक प्रसन्नता लाभेल. जवळचे मित्र भेटतील.

मिथुन:-मनासारखी घटना घडेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. विक्षिप्त लोकांपासून दूर रहा. वेळेबरोबर चालावे लागेल. प्रगतीला चांगला वाव मिळेल.

कर्क:-आवश्यक तेथेच पुढारीपणा स्वीकारावा. गणेशाची आराधना करावी. हस्त कौशल्यासाठी वेळ काढावा. करियर विषयी चिंता वाटू लागेल. आपल्याच विचारात मग्न राहाल.

हेही वाचा : येत्या ८ दिवसांनी ‘या’ ४ राशींच्या संपत्तीत होणार अचानक वाढ? १ वर्षानंतर सूर्याचं महागोचर होताच मिळू शकतो पैसा

सिंह:-मुलांकडून चांगली बातमी समजेल. हवी असलेली उत्तरे मिळतील. व्यवसायिकांनी सतर्क राहावे. कामाच्या स्वरुपात काही बदल करून पहावेत. प्रयत्नांची कास सोडू नये.

कन्या:-कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पहावे. जोडीदाराशी मतभेद टाळा. धावपळीचा दिवस. मात्र धावपळ लाभदायक ठरेल. कौटुंबिक खर्चाचा ताळमेळ घालावा.

तूळ:-आपल्याच मुद्यावर अडून राहाल. मनातील संभ्रम दूर सारावा. उगाचच एखादी चिंता सातवेल. मानसिक दुर्बलता टाळावी. हित शत्रुंवर लक्ष ठेवावे.

वृश्चिक:-गरज नसेल तर फार बोलू नका. सामाजिक कामात मदत नोंदवाल. कर्तुत्वाला वाव मिळेल. उगाच लपवा छपवी करू नका. बौद्धिक ताण जाणवेल.

धनू:-धार्मिक कामासाठी खर्च कराल. भागीदारीत विचारपूर्वक गुंतवणूक करावी. जुन्या गोष्टी फायदेशीर ठरू शकतात. जुनी येणी प्राप्त होतील. कौटुंबिक जबाबदार्‍या चिकाटीने पार पाडाव्यात.

मकर:-कामावर अधिक निष्ठा ठेवावी. कष्टाला मागे पडू नका. धार्मिक कामात सहभागी होण्याची संधी मिळेल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास मिळेल. मित्रांसोबत वेळ घालवाल.

कुंभ:-समोरील संधीचा लाभ घ्यावा. समोरील व्यक्तीवर चटकन विश्वास ठेऊ नका. अधिकार्‍यांचा पाठिंबा मिळवाल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. वेळेचा सदुपयोग करावा.

मीन:-अनावश्यक खरेदी केली जाईल. आहारात अति तिखट पदार्थ टाळावेत. प्रगतीच्या दृष्टीने पाऊल पुढे टाकाल. वादाच्या मुद्यात अडकू नका. व्यावसायिक स्थैर्याकडे लक्ष द्यावे.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader