13th October Rashi Bhavishya & Panchang : आज १३ ऑक्टोबर २०२४ रोजी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथी आहे. दशमी तिथी सकाळी ९ वाजून ०९ मिनिटांपर्यंत चालेल, त्यानंतर एकादशी तिथी सुरू होईल. रविवारी रात्री २ वाजून ५२ मिनिटांपर्यंत धनिष्ठा नक्षत्र जागृत असेल. तर रात्री ९ वाजून २५ मिनिटांपर्यंत शूल योग राहील. आजचा राहू काळ ४ वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत असेल. याशिवाय आज सकाळी ६ वाजता शुक्र वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे.
त्याचबरोबर रविवारी दुपारी ३ वाजून ४४ मिनिटांपासून पंचक सुरू होईल. आपल्या हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्याआधी शुभ मुहूर्त पाहिला जातो. मात्र, ज्योतिषशास्त्रानुसार पंचक सुरु झाल्यानंतर कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. पंचकचा कालावधी पाच दिवसांचा असतो. जो आजपासून सुरु होणार आहे. तर आज कोणत्या राशीचा सुट्टीचा दिवस हसत-खेळत जाईल तर कोणाचा धावपळीचा हे आपण जाणून घेणार आहोत.
१३ ऑक्टोबर पंचांग व राशिभविष्य (13th October 2024 Horoscope and Panchang ) :
मेष:- चांगुलपणाने लोकांना आपलेसे कराल. स्वभावातून परोपकारी भावना व्यक्त कराल. कामातील बदल हिताचा ठरेल. केवळ आपल्या कामावर लक्ष केन्द्रित करावे. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल.
वृषभ:- आपली मानसिकता जपावी. आजचा दिवस शुभ असेल. कुटुंबासोबत संस्मरणीय वेळ घालवाल. दुपार नंतर चांगली बातमी मिळेल. पाहुणे मंडळी भेटतील.
मिथुन:- आपल्या मनोकामना पूर्ण होतील. वडीलधार्या मंडळींचे शुभाशिर्वाद मिळतील. मात्र दिवस काहीसा व्यस्त राहील. नवीन योजना आमलात आणण्याचा प्रयत्न करावा. मन प्रसन्न राहील.
कर्क:- घरातील वातावरण चांगले राहील. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. कोष वृद्धीचे संकेत. व्यावसायिक योजनांना गती मिळेल. भावनिक निर्णय टाळा.
सिंह:- आपल्या बोलण्याने लोकांचे समाधान होईल. एखादी महत्त्वाची इच्छा पूर्ण होऊ शकेल. मुलांच्या जबाबदार्या पार पाडाल. अपचनाचे त्रास संभवतात. आरोग्याची काळजी घ्यावी.
कन्या:- घरात मोठ्या वस्तूंची खरेदी कराल. कामाचा व्याप वाढता राहील. कौटुंबिक वातावरण सुखकर असेल. आपल्या कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल. कामाचा खोळंबा होणार नाही याची काळजी घ्या.
तूळ:- समाधानकारक आनंदी वार्ता समजतील. उत्तमोत्तम संधी मिळू शकतील. शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस. मिळकतीचे नवीन स्त्रोत सापडतील. मोसमी आजार त्रस्त करू शकतात.
वृश्चिक:- अडून राहिलेली कामे पूर्ण होतील. आपल्या मनाप्रमाणे काम पूर्ण करता येईल. बोलताना तारतम्य बाळगवे. विनाकारण डोकेदुखी वाढू शकते. रागावर नियंत्रण ठेवावे.
धनू:- मानसिक समाधान लाभेल. आजचा दिवस खास असेल. भौतिक सुखात वाढ होईल. नोकरदार वर्गाला दिलासा मिळेल. काही क्षुल्लक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
मकर:- धार्मिक कामासाठी पैसे खर्च कराल. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस. मन प्रसन्न राहील. कौटुंबिक जबाबदार्या उत्तमरीत्या पार पाडाल. वाहन चालवताना काळजी घ्यावी.
कुंभ:- दिवस मजेत घालवाल. मिळकत आणि खर्च यांची सांगड घालावी. झेपेल इतकेच काम अंगावर घ्यावे. खरेदी-विक्रीच्या व्यवहारात चोख राहावे. मानसिक प्रसन्नता जपावी.
मीन:- मनातील दूषित गोष्टींना हद्दपार करा. आपल्याच मतावर अडून राहू नका. छोटे प्रवास संभवतात. व्यवसाय वाढीमुळे समाधान लाभेल. वैवाहिक जीवन सुखमय होईल.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर