Ardh Kendra Yog 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार , ग्रहांचे राजा सूर्य या वेळी मीन राशीमध्ये विराजमान आहे. अशात १२ राशींवर याचा परिणाम दिसून येईल. ग्रहाचे राजा सूर्याला आत्मा आणि पिताचा कारक मानले जाते.

मीन राशीमध्ये विराजमान असणाऱ्या लोकांना सूर्य कोणत्या ना कोणत्या ग्रहाबरोबर युती किंवा अंश बलबरोबर शुभ अशुभ योग निर्माण झाल्याने काही राशींवर प्रभाव पडू शकतो. अशात सूर्य अरुण बरोबर ४५ डिग्रीवर असणार ज्यामुळे अर्धकेंद्र राजयोग निर्माण होऊ शकतो.

या राजयोगामुळे काही राशींचे नशीब चमकू शकते. जाणून घेऊ या त्या राशी कोणत्या आहेत. वैदिक पंचांगनुसार, ३० मार्चला सकाळी ८ वाजून ४१ मिनिटांवर सूर्य आणि अरूण एक दुसऱ्यापासून ४५ डिग्रीवर असणार आहे ज्यामुळे अर्धकेंद्र राजयोग निर्माण होईल.

वृषभ राशी (Vrishabha Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी सूर्य अरुणचे अर्धकेंद्र अत्यंत लाभदायक ठरू शकते. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होऊ शकते. सुख सुविधांमध्ये प्रगती होऊ शकते. कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकतील. करिअरच्या क्षेत्रात चांगला लाभ मिळवू शकतो.

वरिष्ठांना या लोकांच्या कामाचे कौतुक करू शकतात. अशात या लोकांची करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. व्यवसायात तयार केलेल्या योजना या लोकांना यशाकडे नेणार. तसेच या लोकांना चांगला मोठा नफा मिळू शकतो.
जर तुम्ही सतर्कतेने पुढे जाणार तर तुम्हाला चांगला पैसा गोळा करता येईल. तसेच चांगल्या जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवू शकाल. नात्यात गोडवा दिसून येईल. तसेच आरोग्य उत्तम राहीन.

तुळ राशी (Tula Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी अर्धकेंद्र राजयोग आनंद घेऊन येणारा असणार. या लोकांना प्रत्येक क्षेत्रात खूप यश मिळू शकते. तसेच हे लोक अध्यात्माकडे वळतील. हे लोक इतरांची सेवा सुद्धा करतील यामुळे त्यांना समाधान मिळेल. कामात व्यस्त राहतील. पण वरिष्ठांबरोबर यांचे संबंध चांगले राहतील ज्यामुळे यांना चांगला लाभ मिळू शकतो. व्यवसायाच्या क्षेत्रात या लोकांना चांगला लाभ मिळू शकतो. हे लोक आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी यशस्वी होऊ शकतात. तसेच या लोकांची पैशांची आवक वाढणार आणि धन संपत्ती गोळा करतील. लव्ह लाइफमध्ये हे लोक जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवतील. या लोकांची सर्व इच्छा पूर्ण होतील.

कुंभ राशी (Kumbha Zodiac)

सूर्य अरुण या लोकांचा अर्धकेंद्र राजयोग या राशीच्या लोकांसाठी खूप चांगला फायद्याचा ठरू शकतो. या राशीच्या लोकांना दीर्घकाळापासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात. कार्यक्षेत्रात वरिष्ठ कामाचे कौतुक करतील. पद प्रतिष्ठा वाढते. वरिष्ठांचे सहकार्य लाभणार. व्यवसायात हळूहळू लाभ मिळणार. प्रतिस्पर्धींना हे लोक चांगली टक्कर देऊ शकतात. तसेच लव्ह लाइफ उत्तम राहीन. कुटुंबाबरोबर हे लोक चांगला वेळ घालवू शकतील.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)