Surya Arun Kendra Yog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला राशिबदल करतो. यावेळी अनेकदा ग्रहाशी युती होते किंवा शुभ राजयोग निर्माण होतो. त्यात सूर्याला सन्मान, नेतृत्व क्षमता, ऊर्जेचा कारक मानले जाते. त्यामुळे सूर्याच्या राशिबदलाने प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर अप्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या परिणाम होत असतो. सूर्य देव १२ फेब्रुवारी रोजी रात्री १२ वाजून ५७ मिनिटांनी अरुण ग्रहासमोर ९० अंशांवर असेल. त्यामुळे केंद्र राजयोग तयार होईल. या राजयोगाच्या निर्मितीमुळे १२ पैकी तीन राशींना आर्थिक लाभासह प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळू शकते. सूर्य-अरुण यांच्या केंद्र राजयोगामुळे नेमक्या कोणत्या राशींना फायदा होईल ते जाणून घेऊ…
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्य १२ फेब्रुवारी रोजी सकाळी मकर राशीत असेल आणि रात्री १० वाजता तो कुंभ राशीत प्रवेश करील. यावेळी क्रांतिकारी ग्रह अरुण (युरेनस) मेष राशीत स्थित असेल.
मेष
सूर्य-अरुण ग्रहाचा केंद्र राज योग मेष राशीच्या लोकांसाठी खूप अनुकूल ठरू शकतो. या राशीच्या लोकांना प्रगतीसह अनेक संधी मिळू शकतात. तसेच तुम्हाला मित्र आणि सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळू शकते. करिअरमध्ये तुम्हाला मोठा लाभ मिळू शकतो. तुम्हाला या काळात तुमच्या कामातून अधिक आर्थिक नफा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचा वेळ चांगला जाईल. त्याशिवाय भागीदारीत केलेल्या व्यवसायाने मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबासह तुमचा वेळ चांगला जाईल. तसेच या काळात तुमच्या आयुष्यात आनंदाचे अनेक क्षण येऊ शकतात.
कुंभ
केंद्र राजयोग कुंभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. या राशीच्या लोकांचा अध्यात्माकडे जास्त कल असू शकतो. या राशीचे लोक अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होऊ शकतात. करिअरच्या क्षेत्रातही त्यांना खूप फायदे मिळू शकतात. तुमच्या कामाची वरिष्ठांकडून दखल घेतली जाऊन, प्रशंसा केली जाईल, तुमच्या कामावर बॉसदेखील खूश होईल. या काळात कामाच्या ठिकाणी तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. मानसिक ताणतणावापासून तुम्हाला मुक्ती मिळू शकते. तसेच समाजात तुमचा आदर वाढू शकतो.
वृश्चिक
सूर्य आणि अरुण यांचा केंद्र योग वृश्चिक राशीच्या लोकांसाठी भाग्यवान ठरू शकतो. या राशीच्या लोकांना सुखी आयुष्य जगता येईल, मालमत्तेतून मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरीतही तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात. त्यामुळे तुम्ही समाधानी असाल. पारंपरिक व्यवसायाच्या तुलनेत व्यापारी आर्थिक गुंतवणुकीतून खूप जास्त नफा कमवू शकतात. आर्थिक परिस्थिती चांगली राहीलं. तुम्ही तुमचे नाते पूर्ण प्रामाणिकपणे टिकवून ठेवण्यात यशस्वी होऊ शकता.