Surya and Mangal Rashi Parivartan: ज्योतिषशास्त्रानुसार, एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. अशातच आता सूर्यदेव आणि मंगळदेव यांची युती होणार आहे. ही युती १७ नोव्हेंबरला वृश्चिक राशीमध्ये होणार आहे. कारण १६ नोव्हेंबरला ग्रहांचा सेनापती मंगळ वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करणार आहे तर दुसरीकडे सूर्यदेव १७ नोव्हेंबरला वृश्चिक राशीमध्ये गोचर करणार आहेत. त्यामुळे मंगळदेव व सूर्य देवाचा संयोग झाल्याने काही राशींना प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे. पाहा तुमच्या राशीचा समावेश आहे का यात…
‘या’ राशीवर सूर्य-मंगळाची अपार कृपा?
सिंह राशी
सिंह राशींच्या लोकांवर या काळात सूर्यदेव आणि मंगळदेवाची अपार कृपा राहू शकते. अडलेली कामं मार्गी लागू शकतात. या काळात नशिबाची साथ मिळाल्याने व्यापारात आणि नोकरीमध्ये उन्नती होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना नोकरीच्या संधी मिळू शकतात. आर्थिक उलाढाल चांगली राहण्याची शक्यता आहे. व्यवहारांमध्ये मोठा फायदा होऊ शकतो.
(हे ही वाचा : गुरु चांडाळ योग संपल्याने ‘या’ राशी होऊ शकतात कोट्यधीशांच्या मालक; तुमच्या राशीला कसा लाभ होऊ शकतो? )
तूळ राशी
सूर्यदेव आणि मंगळाची युती तूळ राशींच्या मंडळीसाठी लाभदायक ठरु शकते. या लोकांच्या जीवनात संपत्ती आणि समृद्धी वाढण्याची शक्यता आहे. पैसा आणि करिअरच्या क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. मानसिक सुख-शांती मिळण्याची शक्यता आहे. या राशीतील लोकांना केलेल्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळण्याची शक्यता आहे.
मीन राशी
सूर्य-मंगळाची या राशीवर विशेष कृपा राहू शकते. अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात या राशीतील लोकांना भरपूर आर्थिक लाभ होऊ शकतो. गुंतवणुकीतून मोठा नफाही मिळण्याची शक्यता आहे. या काळात कंपनीकडून चांगला बोनस मिळण्याची शक्यता आहे. तसेच तुमची कोणतीही मोठी इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते. घरातील कौटुंबिक वातावरण आनंदी राहू शकते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)