Kendra Drishti Yog 2025 : ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्य आणि मंगळाला विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हे दोन्ही ग्रह वेळोवेळी राशी परिवर्तन करतात. वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्याला आत्मा, ऊर्जा, धाडस, आत्मविश्वास आणि प्रसिद्धीचा कारक मानले जाते तर मंगळाची गणना क्रूर ग्रहाच्या श्रेणीमध्ये केली जाते.
ग्रहाच्या चाल बदलल्याने अनेकदा दुर्लभ, शक्तिशाली आणि धोकादायक योग निर्माण होतात. ज्योतिषशास्त्रानुसार, दोन दिवसानंतर म्हणजेच २१ एप्रिल रोजी सूर्य आणि मंगळ केंद्र दृष्टी योग निर्माण करेन. केंद्र दृष्टी योग तेव्हा निर्माण होतो जेव्हा दोन ग्रह एक दुसर्यापासून ९० डिग्रीवर विराजमान असतात. अशात सूर्य आणि मंगळाचा हा मंगलकारी योग काही राशींसाठी लाभदायक ठरू शकतो. त्या राशी कोणत्या आहेत. हे आज आपण जाणून घेणार आहोत.
मेष राशी (Aries Horoscope)
सूर्य आणि मंगळाचा केंद्र दृष्टी योग मेष राशीच्या लोकांसाठी अत्यंक खास असणार आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने मेष राशीच्या लोकांच्या जीवनात आर्थिक सुधारणा दिसून येईल. व्यवसायात आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा उत्तम राहीन. नोकरीमध्ये प्रमोशनचे योग जुळून येईल. आकस्मिक धन लाभ होऊ शकतो.
सिंह राशी (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी हा शुभ योग सकारात्मक बदल घेऊन येईल. जर कोणतेही काम अडकलेले असेल तर ते पूर्ण होईल. व्यवसायात आर्थिक स्थिती उत्तम राहीन. कार्य क्षेत्रामध्ये सहकाऱ्यांचे मदत मिळेल. नोकरीच्या ठिकाणी परिवर्तनाचा योग दिसून येईल. पितृक संपत्तीचा लाभ मिळू शकतो. व्यवसायासाठी प्रवास सकारात्मक दिसून येईल.
वृश्चिक राशि (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या दांपत्याच्या जीवनात सुख समृद्धी लाभेन. व्यवसायात धन स्थितीमध्ये सकारात्मक सुधारणा दिसून येईल. कुटुंबात मोठे भाऊ किंवा वडीलांपासून धन लाभ मिळू शकतो. व्यवसायात प्रगती होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. सरकारी नोकरीची ऑफर मिळू शकते.
मकर राशी (Capricorn Horoscope)
सूर्य मंगळाचा हा केंद्र दृष्टी योग मकर काशीच्या लोकांसाठी अत्यंत लाभदायक ठरू शकतो. या योगच्या शुभ प्रभावाने आर्थिक जीवन उत्तम दिसून येईल. व्यवसायात आर्थिक स्थिती उत्तम राहीन. व्यवसायात लाभ मिळेल. गुंतवणूकीसाठी चांगला लाभ मिळू शकतो.
मीन राशी (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी हा सूर्य मंगळाचा केंद्र दृष्टी योग फायद्याचा ठरू शकतो. हा योग मीन राशीच्या जीवनात सकारात्मक बदल घेऊन येईल. व्यवसायात आर्थिक प्रगती होईल. नवी नोकरीचा प्रस्ताव मिळू शकतो. दांपत्य जीवनात आनंदी वातावरण दिसून येईल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)