Consequences Of Sun and Saturn: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, दर महिन्याला एका विशिष्ट वेळी काही ग्रह त्यांचं स्थान बदलतात आणि त्याचा परिणाम सर्व बारा राशींच्या लोकांच्या जीवनावर होतो. ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला खूप महत्त्व आहे, जे लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. शनी सध्या स्वतःच्या कुंभ राशीत आहेत. २०२४ मध्येही शनि या राशीत राहणार आहेत. परंतु शनीची हालचाल वेळोवेळी बदलणार आहे. याशिवाय सूर्यही दर महिन्याला आपली राशी बदलतो. नऊ ग्रहांमध्ये सूर्याचेही विशेष महत्त्व आहे. ऑगस्ट महिन्यात सूर्यदेव आपली राशी बदलणार आहे. सूर्यदेव सिंह राशीत प्रवेश करणार आहे. दुसरीकडे, शनी त्यांच्या मूळ त्रिकोणी राशी कुंभ राशीत आहेत. यावेळी सूर्य आणि शनी परस्पर आमने-सामने येणार आहेत. त्यामुळे काही राशी आहेत ज्यांना खूप फायदा होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया शनि आणि सूर्य समोरासमोर आल्यावर कोणत्या राशींचे भाग्य उजळेल…

‘या’ राशींचे भाग्य चमकणार?

वृषभ राशी (Vrishabha Zodiac)

सूर्य-शनि समोरा-समोर आल्याने वृषभ राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. या राशीच्या लोकांचे चांगले दिवस येऊ शकतात. व्यवसायात भरपूर फायदा होऊ शकतो. शेअर्स, सट्टा, लॉटरी यातील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यवसायात मोठे यश मिळू शकते. रखडलेली कामे मार्गी लागू शकतात. प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळाल्याने यश मिळू शकतो. हा काळ सर्वच बाबतीत चांगला ठरु शकतो. अडकलेले पैसेही परत मिळू शकतात. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते.

shani budh yuti 2025 saturn and mercury conjunction today horoscope
Shani-Budh Yuti 2025 : १२ फेब्रुवारीपासून ‘या’ राशींच्या लोकांचे झटक्यात पालटणार नशीब; शनी-बुध संयोगाने मिळणार बक्कळ पैसा अन् जबरदस्त यश
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Surya enter in makar rashi
चार दिवसानंतर सूर्य देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींना मिळणार नवी नोकरी आणि संपत्तीचे सुख
Shani rashi Parivartan 2025
येणारे ८० दिवस शनी करणार कल्याण; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना सुख-समृद्धी अन् आकस्मिक धनलाभ होणार
Venus Transit in Purva Bhadrapada
१७ जानेवारीपासून ‘या’ तीन राशींचे भाग्य चमकणार; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने मिळणार प्रेम, पैसा अन् भौतिक सुख
Mangal Gochar 2025
Mangal Gochar 2025: १७ दिवसानंतर चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब, राजाप्रमाणे मिळेल सुख-संपत्ती अन् पैसा
From February 24 the luck of people born under this zodiac sign
२४ फेब्रुवारीपासून ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब फळफळणार! मंगळ होणार मार्गी, मिळणार पैसाच पैसा
Guru Margi 2025
४ फेब्रुवारीपासून ‘या’ तीन राशींचे भाग्य चमकणार; गुरूची चाल देणार पैसा आणि प्रतिष्ठा

(हे ही वाचा: ५ दिवसांनी वाईट काळ संपणार, घरात येणार पैसा! ‘या’ पाच राशी देवगुरुच्या कृपेने होणार गडगंज श्रीमंत? तुमच्या नशिबात काय लिहिलंय?)

सिंह राशी (Leo Zodiac)

सूर्य शनिदेवाच्या कृपेने सिंह राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. या काळात अचानक आर्थिक लाभ आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. आयुष्यातील अनेक संकटं दूर होऊ शकतात. व्यावसायिकांना व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. तसेच व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. या काळात नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. नोकरदार लोकांना नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुमची आर्थिक बाजूही खूप मजबूत होऊ शकते. या काळात तुमची बचतही वाढू शकते. या काळात तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो.

वृश्चिक राशी (Vraschik Zodiac)

सूर्य शनिदेव परस्पर आमने-सामने येताच वृश्चिक राशीच्या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता आहे. जे लोक या काळात आपली नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी नवीन नोकरीची संधी मिळू शकते. यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तुम्ही मालमत्ता वाहन खरेदी करू शकता. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. जुन्या आजारातून आराम मिळू शकतो. अविवाहित असलात तर विवाहासाठी चांगला प्रस्ताव मिळू शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader