Venus And Sun in Aries: वैदिक ज्योतिषाशास्त्रानुसार ग्रह ठराविक काळानंतर गोचर करतात ज्याचा मानवी आयुष्यावर परिणाम होतो. १३ एप्रिलला ग्रहांचा राजा सुर्य आपल्या मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे. तर २४ एप्रिल रोजी धन आणि वैभवाचा दाता शुक्र मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे या दोन्ही ग्रहांची राशीची युतीमध्ये मेष राशीमध्ये होणार आहे. सुर्य आणि शुक्र ग्रहाची युतीमुळे काही या’ राशींचे नशीब सूर्यासारखे चमकणार आहे. तसेच या लोकांना भरपूर धन-संपत्ती मिळणार आहे आणि करिअरमध्येही प्रगती होणार आहे. कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी जाणून घेऊ या.
मेष
मेष राशीच्या लोकांसाठी सुर्य आणि शुक्राची युती अत्यंत लाभदायी असू शकते. कारण ही युती मेष राशीच्या लग्न घरामध्ये झाली आहे. त्यासाठी तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. तसे बँक बॅलन्स देखील या काळात पुर्वीच्या तुलनेत वाढू शकतो. तुम्हाला करिअरमध्ये या काळात काही चांगल्या संधी मिळू शकतात. तसेच या काळात विवाहित लोकांच्या आयुष्य आनंदी असेल. तसेच शुक्र ग्रहच्या कृपेने तुमच्या व्यक्तीमत्त्वामध्ये सुधारणा होईल. तसेच या काळात तुमच्या उत्पनामध्ये वाढ होईल.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी सुर्य आणि शुक्राची युती अनुकूल ठरू शकते. कारण ही युती मिथुन राशीच्या उत्पन्नाच्या घरात निर्माण होणार आहे. त्यामुळे या काळात मिथुन राशीच्या लोकांच्या उत्पन्नामध्ये चांगली वाढ होऊ शकते. तसेच उत्पनाचे नवे मार्ग मिळते. जर नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला या काळात चांगली संधी मिळू शकते. तसेच नोकरीमध्ये लोकांच्या कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये लाभ होऊ शकतो.
हेही वाचा – मंगळ आणि शुक्राच्या युतीने निर्माण होणार ‘धनशक्ती राजयोग’! देवी लक्ष्मी येईल दारी, मिळेल बक्कळ पैसा
कर्क राशि (Cancer Zodiac)
कर्क राशीच्या लोकांसाठी सुर्य आणि शुक्राची युती लाभदायी सिद्ध होऊ शकते. कारण ही युती तुमच्या कर्म स्थानी निर्माण होणार आहे. त्यामुळे तुमचा काम -व्यवसायामध्ये चांगले यश मिळू शकते. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. धर्म कर्म संबधीत प्रवासाचा योग येऊ शकतो. एवढेच नाही तुम्हाला यश मिळण्याचा योग देखील निर्माण होत आहे. तसेच बेरोजगार लोकांना नोकरीमध्ये नवीन संधी मिळू शकतात. तसेच व्यापाऱ्यांसाठी सध्या चांगला धनलाभ होऊ शकतो. या काळात तुमच्या वडीलांसह तुमचे संबध चांगले होतील.
(टिप- हा लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)