Budhaditya Rajyog Astrology: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतो ज्याचा प्रभाव शुभ किंवा अशुभ स्वरूपात तसेच कमी अधिक प्रमाणात सर्व १२ राशींवर दिसून येतो. काही वेळा ग्रह एकाच वेळी एकाच राशीत येत असल्याने यातून काही शुभ व दुर्लभ योग सुद्धा साकारले जातात. असाच एक लाभदायक योग म्हणजेच बुधादित्य राजयोग येत्या १० दिवसांनी तयार होत आहे. १४ एप्रिलपासून पुढील तीन आठवडे बुधादित्य राजयोग कायम असणार आहे. यावेळेस सूर्य व बुध या ग्रहांच्या युतीने हा राजयोग तयार होत आहे. या राजयोगाचा प्रभाव काही राशींवर अत्यंत स्पष्टपणे होण्याची चिन्हे आहेत. तीन अशा राशी आहेत ज्यांना या काळात बुधादित्य राजयोगाने बलाढ्य धनलाभ होण्याची शक्यता आहे. या राशी कोणत्या व त्यांना नेमका कसा फायदा होणार हे सुद्धा पाहूया…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुधादित्य राजयोग बनल्याने ‘या’ राशी होतील श्रीमंत?

सिंह रास (Leo Zodiac)

बुधादित्य राजयोग हा सिंह राशीच्या भाग्य व कर्म स्थानी तयार होत आहे. याचा अर्थ असा की तुम्ही करत असलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला नशिबाची भक्कम साथ लाभू शकते. तुम्ही आजवर कामाच्या ठिकाणी घेतलेल्या अपार कष्टाचे गोड फळ तुम्हाला येत्या काळात मिळणार आहे. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खूप खुश झाल्याने तुमच्या भाग्यात पदोन्नती व पगारवाढीचा संकेत आहेत. तुमच्या राशीत बुध ग्रह हा धन व आर्थिक प्राप्तीचा स्वामी मानला जातो. यामुळे बुधाच्या आशीर्वादाने तुम्हाला अपार धनलाभ व श्रीमंतीची संधी मिळू शकते.

कर्क रास (Cancer Zodiac)

बुधादित्य राजयोग हा आपल्या राशीचं कर्मस्थानी तयार होत आहे यामुळे आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये कामाचे माध्यम बदलले जाणवून येऊ शकते. या नव्या मार्गाने तुम्ही खोऱ्याने पैसे ओढू शकाल. बुध ग्रह तुमच्या गोचर कुंडलीच्या १२ व्या स्थानिकाचे म्हणजेच साहस व पराक्रम स्थानाचे कारक आहेत यामुळे तुम्हाला येत्या काळात काही अत्यंत महत्त्वाचे व मोठे निर्णय घेण्यासाठी तयार राहावे लागेल. आपल्याला भाऊ- बहिणीची साथ लाभू शकते. तुमच्या हातून विनाकारण खर्च होण्याची चिन्हे आहेत त्यामुळे पगार किंवा कोणताही आर्थिक फायदा होताच त्यातील ठराविक रक्कम वेळीच बाजूला काढून ठेवणे योग्य ठरेल.

हे ही वाचा<< शनीदेव अडीच वर्ष ‘या’ 3 राशींवर करणार धन वर्षाव? ‘या’ रूपात लक्ष्मी बनवू शकते तुम्हाला कोट्याधीश

मेष रास (Mesh Zodiac)

बुधादित्य राजयोग हा आपल्यासाठी काही बदलाचे संकेत घेऊन येत आहे. बुध व सूर्याची युती आपल्या राशीच्या लग्न स्थानी तयार होणार आहे त्यामुळे तुम्हाला येत्या काळात इतर म्हणजेच तुमचे जोडीदार किंवा व्यसायातील भागीदार यांच्या रूपात आर्थिक लाभ होऊ शकतो. सूर्य देव तुमच्या राशीच्या शिक्षण, प्रेम व नात्यांच्या बांधणीचे स्वामी आहेत. बुध ग्रह हा साहस, पराक्रम, रोग व शत्रू यांचा कारक आहे. तुम्ही ज्या गोष्टीसाठी मेहनत केली असेल त्यात यश लाभू शकते पण तुमचा आत्मविश्वास तुमच्या बाजूने काम करेल याची खात्री तुम्हालाच करावी लागेल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Surya budh transit makes shubh budhaditya rajyog these zodiac signs get more money after 14th april 2023 astrology svs