Surya Budh Yuti 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह हा एका ठराविक वेळी गोचर करतो ज्याचा प्रभाव कमी अधिक प्रमाणात सर्व राशींवर पडत असतो. आता ऑक्टोबर महिना सुरू झाला असून या महिन्यात अनेक ग्रहांचे गोचर होणार आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच १ ऑक्टोबर रोजी बुध ग्रहाने कन्या राशीत प्रवेश केला आहे. अशा स्थितीत सूर्य कन्या राशीत आधीपासूनच असल्यामुळे कन्या राशीत सूर्य-बुधाच्या युतीने बुधादित्य राजयोग निर्माण झाला आहे. हा राजयोग चार राशींसाठी अचानक धनलाभ घेऊन येणारा ठरु शकतो. चला तर पाहूयात कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी….
‘या’ चार राशींचे अच्छे दिन?
मेष राशी
बुधादित्य राजयोग तयार झाल्याने मेष राशीतील लोकांना चांगले दिवस अनुभवता येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी नफा मिळू शकतो. कुटूंब आणि वैवाहीक जीवनात सुख समृद्धी येऊ शकते. हाती घेतलेले काम यशस्वी होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी कौतुक होऊन एवढंच काय तर प्रमोशन होण्याची सुद्धा शक्यता आहे.
वृषभ राशी
बुध आणि सूर्याच्या युतीने वृषभ राशीच्या लोकांना अनुकूल परिणाम मिळू शकतात. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. कामात यश मिळू शकतो. उत्पन्नात वाढ होऊ शकते. रखडलेले काम मार्गी लागण्याची शक्यता असून कुटूंबाचे सहकार्य मिळण्याची शक्यता आहे.
(हे ही वाचा : नोव्हेंबरपासून ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा? शुक्रदेव गोचर करताच माता लक्ष्मीच्या कृपेने होऊ शकता लखपती )
कर्क राशी
कर्क राशीच्या लोकांना या काळात अधिक नफा होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना जमिनीशी संबंधित लाभ मिळू शकतात. याशिवाय त्यांच्याकडे पैसे मिळवण्याच्या संधीही चालून येऊ शकतात. मानसन्मानात वाढ होऊ शकते. करिअरमध्ये वेळ चांगला असून प्रमोशनच्या संधी मिळू शकतात.
सिंह राशी
बुधादित्य राजयोग सिंह राशीच्या मंडळीना अपार धनलाभ देऊ शकतो. वैवाहिक जीवनात संतती प्राप्त होण्याचीही शक्यता आहे. व्यवसायात यश मिळू शकते आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना चांगले निकाल मिळून करिअरमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)