Mahashivratri 2025 : महाशिवरात्रीवर या वेळी कुंभ राशीमध्ये एक दुर्लभ संयोग निर्माण होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहाचा राजा सूर्य, ग्रहाची राणी चंद्रमा, ग्रहाचा राजकुमार, बुध आणि न्याय‍धीश शनि हे चारही ग्रह एकाच राशीमध्ये गोचर करणार आहे. हा विशेष योग कर्क आणि कुंभ राशी सह पाच राशींच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे.

या राशींच्या लोकांना नशीबाची साथ मिळेन. या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येईल. करिअर आणि व्यवसायात तसेच शिक्षणात यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळू शकतात. व्यापारांसाठी हा काळ अतिशय लाभदायक ठरू शकतो.

मिथुन राशी

ग्रहांच्या या विशेष संयोगामुळे मिथुन राशीच्या लोकांना करिअरमध्ये प्रगती दिसून येईल. उच्च शिक्षण प्राप्त करण्याचा विचार करत असा तर यश मिळू शकते. व्यवसायात या लोकांना लाभ मिळू शकतो. धार्मिक कार्यामध्ये आवड निर्माण होऊ शकते.
नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशनची चांगली संधी मिळू शकते. विदेशात जाण्याचा विचार करत असाल तर यावेळी अर्ज करू शकता. यश मिळू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना नशीबाची साथ मिळू शकते.

सिंह राशी

सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. पण मोठ्या भावांबरोबर वाद होऊ शकते. आपल्या स्वभावावर नियंत्रण ठेवावे. जर तुम्ही कोणता नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा उत्तम काळ आहे. घरात मांगलिक कार्य संपन्न होणार. शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. कुटुंबाबरोबर प्रवासाचा योग जुळून येईन ज्यामुळे मन प्रसन्न राहीन.

तुळ राशी

तुळ राशीच्या लोकांसाठी हा गोचर आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो. व्यवसायात या लोकांना चांगला नफा मिळू शकतो. नवीन नोकरीची संधी मिळू शकते. राजकीय लोकांसाठी हा काळ उत्तम आहे. प्रभावशाली व्यक्तीबरोबर संबंध आणखी दृढ होतील. कार्य क्षेत्रात प्रगती दिसून येईल. कुटुंबात सुख समृद्धी नांदेल. खाण्या पिण्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नये.

मकर राशी

मकर राशीच्या लोकांना या ग्रहाच्या संयोगामुळे करिअर आणि व्यवसायात लाभ मिळू शकतो. अनावश्यक खर्चापासून हे लोक वाचू शकता. प्रवासा दरम्यान सतर्क राहणे आवश्यक आहे. विरोधकांचा सामना कराल आणि न्यायालयीन प्रकरणात यश मिळेल. कार्य क्षेत्रात वरिष्ठांबरोबर संबंध चांगले राहीन. पार्टनरशिपमध्ये केलेल्या व्यवसायात नफा मिळू शकतो. आरोग्यावर विशेष काळजी घ्यावी.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader